
चांदुर बाजार /मनोज बारस्कर
चांदुर बाजार तालुक्यातील घाटलाडकी येथे हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र एक वृक्ष आईच्या नावाने योजने अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी जिल्हा परिषद उर्दु शाळा, देवी नगर, व एक वृक्ष आई च्या नावाने वृक्ष लावणाऱ्यां नागरिकांना रुक्षाचे वाटप करण्यात आले, पंचायत समिती मार्फत प्रत्येक ग्राम पंचायतीला 250 झाडाचे लक्ष देण्यात आले होते झाडाचे संवर्धन व पालनपोषण होईल अशा जागेवर झाडे लावण्यात आली यावेळी गट विकास अधिकारी डॉ. निलेश वानखडे यांनी रक्षारोपण कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद उर्दु शाळा व जिल्हा परिषद मराठी शाळेची पाहणी करण्यात आली व योग्य त्या सूचना देण्यात आल्या यावेळी सरपंच शिवानंद मदने, उपसरपंच अब्दुल हाफिज शेख रसूल, विस्तार अधिकारी पंचायत रामेश्वर रमागडे,ग्राम पंचायत अधिकारी निलेश घुरडे, अभियंता राजेश अडगोकार, सुनील ढेवळे, अब्दुल खलिक, रोशन जयसिंगपूरे, मनोज बारस्कर,जिल्हा परिषद उर्दु शाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक,शिक्षकरुद्ध, ग्राम पंचायत कर्मचारी, रोजगार सेवक शुभम निभोरकर, रोजगार हमी योजनेचे कामगार यावेळी उपस्थित होते.