
संत्रा, कांदा, ज्वारी पिकाच्या गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 81995880 रुपये मंजूर
चांदुर बाजार / मनोज बारस्कर
चांदुर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी महसूल मंडळात झालेल्या मे महिन्यातील गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा, कांदा, ज्वारी पिकाचे नुकसान झाले होते. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन युवासेना तालुका प्रमुख रोशन जयसिंगपूरे यांनी तहसीलदाराना दिले होते त्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकरी सोबत आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाला यश आले असून ब्राम्हणवाडा थडी महसूल मंडळातील घाटलाडकी येथील चार साझे, खिंनखीनी येथील नऊ साझे,सोनोरी येथील चार साझे, सुरळी येथील चार साझे, ब्राम्हणवाडा थडी येथील नऊ साझाचा समावेश आहे यामध्ये पधरा हजार शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत एक हेक्टरी प्रमाणे फळबाग करीता 22500 रुपये, बागायती करीता 17000 हजार रुपये नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे गारपीट व अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळत असल्याने शेतकऱ्यांनी युवासेना तालुका प्रमुख रोशन जयसिंगपूरे यांचे आभार मानले आहे
मे महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे संत्रा, कांदा,ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हॊते आम्ही वारंवार पाठपुवारा करीत राहिलो आंदोलन केले याचे फळ आता मिळाले असून यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे.
रोशन जयसिंगपूरे
युवासेना तालुका प्रमुख चांदुर बाजार