
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सप्ताह निमित्ताने व वृक्ष संवर्धन माझी वसुंधरा ह्याचे औचित्य साधून साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येऊन वृक्षारोपण पंधरवडा आयोजित करण्यात आलेला आहे.
त्यानिमित्ताने आज रोजी ग्रामपंचायत ग्रामस्थ यांच्यावतीने वृक्षारोपण करण्यात येऊन पंधरवड्यामध्ये वृक्ष लागवड करण्यात येईल यावेळी ग्रामपंचायत सरपंच संगीता झंजाट सदस्य विभा ढगे रत्नाबाई गोतमारे अरविंद गाडेकर सचिव अरुण रायबोले तलाठी अमोल श्रीखंडे आरोग्य विभागाचे कर्मचारी त्याचप्रमाणे डॉक्टर शुभांगी दिघडे सविताताई जगताप गावातील इतर मंडळी उपस्थित होती कार्यक्रमाची सांगता उपसरपंच राजेंद्र सरोदे यांनी केली.