
तिवसा/ तालुका प्रतिनिधी
दिनांक 31/082025 रोजी कल्पतरू प्रभाग संघ कुऱ्हा अंतर्गत रुक्मिणी ग्रामसंघ, मारडा येथे ग्रामीण भागातील महिलांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन हनुमान मंदिर सभागृह मारडा येथे करण्यात आले. आयोजित शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, थायरॉईड, नाडी परीक्षण, एच.आय.व्ही. एच.बी.आय.सी. एकूण दहा विविध प्रकारच्या वैद्यकीय तपासणी करण्यात आल्या.
यामध्ये स्थानिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.आयोजित कार्यक्रमात सहा.गट विकास अधिकारी श्री. नारायण अमझरे साहेब, पं.स.कृषी अधिकारी यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. श्री. सहा. गट विकास अधिकारी श्री. नारायण अमझरे सरांनी महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, महिलांना नियमित आरोग्य तपासणीची सवय लागावी, ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टरांची सुविधा उपलब्ध करून देणे या मुख्य उद्देशानव्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले. आयोजित शिबिरात उपजिल्हा रुग्णालय, तिवसा येथील डॉ. प्रशिक वानखडे (सर्वसाधारण वैद्यकीय अधिकारी) अधिपरिचारिका सौ. गीता खेडकर व उपस्थित आरोग्य कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उमेद कक्ष येथील तालुका अभियान व्यवस्थापक श्री. हरिष अ. फरकाडे, श्री.अजय कुलथे (ता.व्य.), श्री. स्वप्नील रोहनकर (ता.व्य.), सौ. श्रुती वानखडे (ता.व्य.), सौ. रूपाली मेहकरे (प्रभाग समन्वयक) व स्वयं सहायता समूहातील सदस्य व समुदाय संसाधन व्यक्ती आदी मान्यवरांची उपस्थिती होती.उपस्थित महिलांनी महिलाहीतार्थ अशा उपक्रमांचे ग्रामस्थरावर नियमित आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.