
७ आरोपीसह ३ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त
अकोट / तालुका प्रतिनिधी
अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रहार अंतर्गत अकोला जिल्ह्यात सद्या धडक कारवाया सुरू आहेत.त्या प्रमाणे अकोट ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अकोट ते बोर्डी रोड वरील अब्दुल सलीम अब्दुल जलील यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या झोपडी मध्ये काही लोक पैशाच्या हारजितीवर जुगार खेळत आहेत.अशा गोपनीय माहितीनुसार पंचां समक्ष रेड केली असता आरोपी शेख अक्रम शेख मुस्तफा,अंदर अली खुर्शिद अली,समीर खान शेर खान,मोहम्मद सलीम मोहम्मद अकबर,शेख अयुब शेख सत्तार,मोहम्मद अकिल मोहम्मद मुजेदार,फिरोझ अली जमीर अली,सर्व राहणार अकोट या आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्या कडून ३५६०६ रुपये नगदी व ६ मोबाईल किंमत ७१००० रुपये,४ मोटारसायकल किंमत २,५०,००० रुपये,असा एकूण ३ लाख २४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,तसेच अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात उमेश सोळंके,हरीश सोनवणे,शिवकुमार तोमर,वासुदेव ठोसरे,राजेश माळेकर,सुनील पाटील,यांनी केली आहे.