राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम
चांदुर बाजार/एजाज खान
चांदूरबाजार येथील गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राथमिक आरोग्य केंद्र तळवेल, उपकेंद्र, नानोरी व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आभा कार्ड व सीपीआर प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. प्रियदर्शनी देशमुख तर प्रमुख मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विकास नेहटकर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. विकास नेहटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आभा कार्ड काढणे अलीकडच्या काळात सगळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असून त्यात आपल्या आरोग्यविषयक सर्व माहिती एकवटलेली असते. आपण दवाखान्यात गेल्यानंतर तिथे पावती फाडावी लागते. डॉक्टरांचे रिसिप्ट, फाईल वगैरे सोबत घेऊन फिरावी लागते. हे ॲप आपण प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून ठेवल्यास आरोग्यासंबंधी कुठलेही कागदपत्र सोबत बाळगायची गरज पडणार नाही. या आभाकार्डमध्ये तुमच्या सर्व आरोग्यासंबंधीची माहिती दिलेली असते आणि आपले दवाखान्याचे सर्व काम सोयीस्कर होईल. तसेच सीपीआर संबंधीसुद्धा विद्यार्थ्यांना माहिती देऊन सीपीआर हा कधी करायचा याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले आणि विद्यार्थ्याकडून प्रत्यक्ष कृती करून घेतले तर डॉ. प्रियदर्शनी देशमुख यांनी विद्यार्थ्यांना आपण आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे किती आवश्यक आहे यासंबंधी माहिती दिले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दुमटकर यांनी केले तर आभार डॉ. निधी दीक्षित यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
