
सामाजिक भान जपत तीन दिवस सामाजिक कार्य व प्रबोधनाचा जागर
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
दुर्लक्षित घटकांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांना मदतीचा हात देणारे इंजिनिअर अतुल रामटेके यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपला वाढदिवसाच्या निमित्ताने तीन दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला.
ज्या समाजात माझा जन्म झाला त्या समाजाचा उद्धार करणे माझे कर्तव्य आहे याची ज्याला जाणीव आहे ते धन्य होत. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश शिरोधार्य मानत समाजातील उपेक्षित घटकांसाठी सदैव समाजपयोगी कार्य करत
विविध ठिकाणी शैक्षणिक मदत तथा सामाजिक बांधिलकी साठी परिचित असलेले इंजिनिअर अतुल रामटेके यांनी आपल्या जन्मदिनाच्या निमित्ताने जिल्हयात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवत प्रबोधनात्मक जागर करून नवा आयाम निर्माण केला आहे. रामटेके यांनी प्रश्नचिन्ह आदिवासी शाळा मंगरूळ चव्हाळा येथे मदत करून सत्यपाल महाराज यांचे शिष्य कमलपाल गाठे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम साजरा केला. यासह नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधील खीरसाणा सावनेर फुबगाव व भातुकली तालुक्यामधील सायत ,खालकोनी, आष्टी विर्शी, देवरी शाळेमध्ये शालेयपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. सोबतच संत गाडगेबाबा वृद्धाश्रम वलगाव येथे फळवाटप, वर्षावास निमित्ताने कठोरा, रामगाव, टाकळी, गोपाळपूर, नांदुरा, टेम्भा, नया अकोला, पुसदा येथील विहारात सुरू असलेल्या ग्रंथ वाचन निमित्त वाचकांचा सत्कार करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. सदर सामाजिक उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी , मुख्याध्यापकांनी यांनी विशेष कौतुक केले आहे.
इंजिनिअर रामटेके यांनी साजऱ्या केलेल्या विविध सामाजिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश राऊत, मिलिंद सवई, यांनी सहकार्य केले.