
गटविकास अधिकाऱ्यांनी दिली भेट
तिवसा /तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व पंचायत समिती तिवसा यांचे वतीने पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर गौरव अभियान अंमलबजावणी अंतर्गत तयार करण्यात आलेल्या पोषण परसबाग व IFC अंतर्गत रोपवाटिकेला सहाय्यक गटविकास अधिकारी नारायण आमझरे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. बचत गटातील महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे याकरिता त्यांना सेंद्रिय पद्धती पद्धतीचा भाजीपाला मिळावा तसेच पालेभाज्या व फळे यांचा त्यांच्या जेवणामध्ये समावेश व्हावा. याकरिता परसबागेची संकल्पना अस्तित्वात आली आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात राहणाऱ्या बचत गटातील महिलांचे आरोग्य सुदृढ राहील व त्यांना निशुल्क सेंद्रिय पद्धतीने तयार करण्यात आलेला भाजीपाला व फळे मिळतील. हा यामागील दृष्टिकोन आहे.एकात्मिक शेती प्रभाग हा प्रकल्प, तिवसा तालुक्यात राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत तळेगाव ठाकूर येथील जय संतोषी या स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून रोपवाटिका विकसित करण्यात आली आहे. त्या रोपवाटिकेमध्ये विविध प्रकारचे भाजीपाल्याचे रोपे विकसित करण्यात येत आहेत. येणाऱ्या काळात रोपवाटिकेच्या माध्यमातून तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता भाजीपाल्याचे रोपे उपलब्ध होणार आहेत. याप्रसंगी उमेद कक्षातील हरीश फरकाडे bmm स्वप्नील रोहणकर BM – SIIB&CB, अजय कुलथे BM – FI, सौ. श्रुती वानखडे BM – MIS,M&E, प्रभाग समन्वयक श्रीकृष्ण काळे,सुमित वसूकर, सौ. रेश्मा भितकर IFC ब्लॉक अँकर व उमेद कॅडर उपस्थित होते.