
ठाणेदार श्रीराम लाबडे यांचे आवाहन
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर पोलिस स्टेशन हद्दीत सध्या जप्त करण्यात आलेल्या ८१ बेवारस वाहनांचा लिलाव येत्या २८ जुलै २०२५ रोजी करण्यात येणार आहे. यासंदर्भात पोलिस ठाण्याचे ठाणेदार श्रीराम लांबाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सदर माहिती दिली आहे.नांदगाव खंडेश्वर पोलिस ठाण्याच्या आवारात उभ्या असलेल्या या वाहनांची ओळख पटलेली नाही. संबंधित मालकांनी वेळेत पुढाकार घेतला नसल्याने नियमानुसार ही वाहने लिलाव विक्रीसाठी खुली करण्यात येणार आहेत. इच्छुक व्यक्तींनी लिलावात सहभागी होण्यासाठी ५०,०००/- रुपये डिपॉझिट (रु. पन्नास हजार) सोबत दिनांक २६ जुलै २०२५ रोजी सकाळी ६:०० वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहणे आवश्यक आहे.प्रत्येक वाहनाविषयी कोणताही वाद नोंदवता येणार नाही आणि वाहनांची स्थिती ‘जशी आहे तशी’ मान्य करावी लागेल. इच्छुक व्यक्तींनी आपले ओळखपत्र, इन्शुरन्स कागदपत्रे, ड्रायविंग लायसन्स व इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन लिलावात सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.ही कार्यवाही बोली लिलावाच्या नियमानुसार पार पडणार असून लिलावात सहभाग घेण्यासाठी सर्व नागरिकांना व व्यापाऱ्यांना संधी देण्यात येत आहे.
संपर्क:
पोलीस ठाणेदार – नांदगाव खंडेश्वर,
जिल्हा – अमरावती ग्रामीण
फोन: ०७७१–२२२६४२
ई-मेल: ps.nandgaonkh.am@mahapolice.gov.in
तरी याचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.