
67 रक्तदात्यानी केले रक्तदान
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले ब्लड डोनर ग्रुप अमरावती विदर्भ महाराष्ट्र राज्य व गुरुदेव फाउंडेशन यांच्यातर्फे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने 18 जुलै 2025 या रोजी पिंपरी नांदगाव खंडेश्वर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात 67 रक्तदात्यांनी रक्तदान केले संस्थापक अध्यक्ष योगेश घोडे व गुरुदेव फाउंडेशनचे अध्यक्ष अरविंद कडू सरपंच मंगेश कांबळे यांच्या पुढाकाराने ही शिबिर आयोजित करण्यात आले होते फक्त संकलना करिता जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीची सहकार्य मिळाले यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले ब्लड डोनर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री योगेश घोडे सचिव सागर दामेकर अध्यक्ष अरविंद कडू सरपंच मंगेश कांबळे वैभव ठाकरे तुषार इंगळे मनीष काळेमेघ मनोज गावंडे विनोद कपिले सागर ढेंगेकर गुरुदयाल सिंग निलेश हळदे व जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी येथील डॉ.वाघमारे,मिलिंद तायडे,योगेश पांनझाडे यांची उपस्थिती होती.