
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे.
महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
रेवसा येथे प्रेरणा बुद्ध विहारांमध्ये शाहू फुले आंबेडकर सामाजिक संस्था वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिमेचे पूजन चंदू भाऊ जोंधळे, अंकुश अंबोरे,, सचिन ढोके ,अभिजीत जोंधळे, शैलेश पौवनीकर, आदरांजली वाहण्यात आली. मान्यवरांच्या आपले मनोगत व्यक्त करण्यात आले . १८ जुलै हा दिवस महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहासात ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ या महत्त्वाच्या नावाने कोरला गेला आहे.. या दिवशी अण्णा भाऊंनी आपला देह ठेवला असला, तरी त्यांची विचारसंपदा आणि संघर्षशील लेखणी काळाच्या सीमा ओलांडून आजही जिवंत आहे. शोषित, पीडित, भटक्या-विमुक्त, दलित आणि कष्टकरी समाजाचा बुलंद आवाज बनून अण्णा भाऊंनी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या कार्याचा मागोवा घेणे ही सामाजिक कृतज्ञतेची खरी अभिव्यक्ती आहे. यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.
१८ जुलै १९६९ रोजी अण्णा भाऊ साठे यांचे निधन झाले, पण त्यांचे विचार आजही आपल्यात जिवंत आहेत. त्यांचे साहित्य आजही समाजातील अन्याय आणि विषमतेवर बोट ठेवते. जागतिकीकरणानंतर वाढलेली आर्थिक विषमता, रोजगाराचा प्रश्न, ग्रामीण भागातील दारिद्र्य, शेतकरी आत्महत्या यांसारख्या समस्या आजही मोठ्या प्रमाणावर आहेत. अशा परिस्थितीत अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांची आणि त्यांच्या कार्याची प्रासंगिकता अधिकच वाढते. त्यांचे साहित्य आजही आपल्याला प्रेरणा देते की, आपण आपल्या हक्कांसाठी लढायला हवे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवा आणि समतावादी समाजाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आजही समाजात जातीभेद, आर्थिक विषमता, शिक्षणाची दरी, महिलांवरील अन्याय, भटके-विमुक्त समाजाचे दुःख कायम आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास केल्यास आजही त्यातली सामाजिक जाणीव आपल्याला अंतर्मुख करते.
प्रामुख्याने उपस्थित सावन इंगोले ,गोकुळ सिरसाट, विजय अंबोरे ,ऋषिकेश सिरसाट, रोहित खंडारे, प्रदीप इंगोले ,लीलाधर जोंधळे ,रितेश तेलमोरे ,गौरव कांबळे ,यश खडसे, गजेंद्र अंबोरे ,सुजित जोंधळे सनी सिरसाट, सुरज बनसोड, सचिन हाडे ,विवेक जोंधळे यावेळी सूत्रसंचालना तेजस प्रदीप ढोके यांनी केले तर संस्थेचे वतीने आभार प्रदर्शन गोकुल सिरसाठ यांनी केले यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सर्व संस्थेच्या पदाधिकारी तथा सदस्य गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.