
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीचे आयोजन.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत व कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशन पुणे यांचे संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियान नागरी २.० अंतर्गत दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत स्थापन केलेल्या महिला बचत गटातील एकूण १०० महिलांचे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये महिलांना उपजीविकेकरिता सुका कचरा प्रक्रिया केंद्र चालवणे, पुनर्वापर योग्य वस्तु कचऱ्यात न जाऊ देता त्याचे वेगळे संकलन करून दुरुस्ती व विक्री करणे, इ-कचरा चालवणे, कपडयांच्या कचऱ्याचा पुनर्वापर, बांधकामाच्या राडारोड्यावर प्रक्रिया व उत्पादन, खतनर्मिती (कंपोस्टिंग बायोगॅस), फुलांच्या निर्माल्यापासून वापरलेल्या फुलांपासून अगरबत्ती बनविणे व जुन्या कपड्यांपासून विविध प्रकारचे पॉकेट, पर्स, पिशव्या बनाविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. व्यवसाय विषयक मार्गदर्शन व बाजारपेठ कशी उपलब्ध करता येईल,याबाबत मा. मुख्याधिकारी निवृत्ती गणेश भालकर यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती देण्यात आली. तसेच नगर पंचायत नांदगाव खंडेश्वर येथील स्वच्छता निरीक्षक प्रीतम सोनटक्के सर, स्वच्छते विषयक व वृक्ष लागवड विषय महत्व पटवून दिले आणि NULM च्या उज्वला पोफळे आणि शहर समन्वयक नेमिनाथ सानप सर तसेच कुशाग्र फाउंडेशन पुणेचे प्रकाश जोगदंड, प्रफुल गायकवाड, यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांना कापडी पिशवी बॅग, प्रमाणपत्र वही पेन व इत्तर साहित्य वाटप करण्यात आली.