७ आरोपींविरोधात गुन्हा दाखल, २ लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त
चांदुर रेल्वे / तालुका प्रतिनिधी
चांदुर रेल्वे पोलिसांनी पळसखेड येथील स्मशानभूमीजवळील टेकडीवर सुरू असलेल्या एक्का बादशहा नावाच्या हारजीतच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकत मोठी कार्यवाही केली. या कारवाईत चार जणांना रंगेहाथ अटक करण्यात आली असून, तीन आरोपी फरार झाले आहेत. कारवाईदरम्यान पोलिसांनी रोख रक्कम, मोबाइल, मोटारसायकलसह एकूण २,०६,३००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलीस पळसखेड येथे रवाना झाले. स्मशानभूमीजवळ टेकडीवर काही व्यक्ती गोलाकार बसून जुगार खेळत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकला. या कारवाईत ७३००/- रुपये रोख, १४०००/- रुपये किंमतीचे दोन अँड्रॉईड मोबाइल, तसेच खालील तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.त्यामध्ये
मोटर सायकल क्र.एम.एच-27 डी.जी-4702 (किंमत – ७०,०००/- रुपये)
एम.एच-27 डी.सी-7067 (किंमत – ६५,०००/- रुपये)
डिस्कव्हर (बिनानंबर, किंमत ५०,०००/- रुपये अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत निखील रामकृष्ण राऊत (वय ३२, रा. सावंगी संगम),आशिष श्रीराम सहारे (वय ३२, रा. पळसखेड),जानराव विठ्ठलराव लाडे (वय ५५, रा. चांदुर रेल्वे),संदीप मुकुंदराव पुंड (वय ३५, रा. पळसखेड) फरार आरोपीची नावे देवा भिमरावजी मानकर (रा. धानोरा म्हाली),अनिकेत सुधाकर बावणे (रा. पळसखेड),शेख जावेद शेख शेरू (रा. पळसखेड) आहेत. वरील आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा १२(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद,अप्पर पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय आकरे यांच्या नेतृत्वात पापडली.कारवाईदरम्यान परि पोउपनि रोहित कुदळे,पोलीस अंमलदार राहुल इंगळे,शिवाजी घुगे,निलेश रिठे,नितीन शेंडे,संदीप वासनिक, गजान वाघमारे,प्रविण मेश्राम, संदीप बटुकले,ऋकेश व स्वप्नील यांचा सक्रिय सहभाग होता.पोलिसांची ही कार्यवाही परिसरात कौतुकाचा विषय ठरत असून, नागरिकांतून पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.
