
तिवस्याचे समाजसेवा क्षेत्रात राबणारे ‘आझाद जमा खान’ यांना अक्षर मानवने राज्य स्तरावर काम करण्याची संधी दिली.
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
अक्षर मानव ही संघटना साहित्य, समाज,कला, शिक्षण, पर्यावरण, उद्योग,श्रम, विज्ञान अश्या मानवी जगण्याच्या 96 विषयात काम करते या सर्व विषयांच्या अनुषंगाने विविध संमेलने, शिबिरे, कार्यशाळा गप्पा, संवाद सहवास, माणूस संमेलन, साहित्य संमेलन, शिक्षण संमेलन, चित्रपट संमेलन अशा प्रकारचे उपक्रम महाराष्ट्रभर विविध भागात राबवते. अक्षर मानव संघटना ही जाती, धर्म, देव, वर्ग, वर्ण, लिंग, प्रदेश, भाषा याच्या पलीकडे जाऊन माणसाला एकत्रित आणणारी आंतरराष्ट्रीय माणसांची संघटना आहे.अशा अनेक क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या संघटनेच्या राज्य संघटक पदी तिवस्याचे आझाद जमा खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी लेखक, साहित्यिक, कथा – कादंबरीकार राजन खान यांच्या उपस्थितीत चाळीसगाव येथे पार पडलेल्या बैठकीत आझाद खान यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना राज्य संघटक म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली आली आहे. सर्वांच्या मदतीने माणुसकीच्या मुल्यावर आधारित समाजरचनेची स्वप्न उराशी बाळगून सर्व भेदांच्या पलिकडे जाऊन अक्षर मानव चळवळीचे कामं महाराष्ट्राच्या 36 ही जिल्ह्यात संघटना बांधण्याची मोहिम हाती घेऊ. तसेच अक्षर मानवचा विचार महाराष्ट्रभर पोहचवण्यासाठी मी सदैव कार्यरत राहणार आहे. प्रत्येक गावात आणि शहरात अक्षर मानव शाखा उघडली जाईल संघटना राज्यभर मजबूत करुन लोकांपर्यंत परिवर्तनवादी, मानवतावादी, समतावादी विचार आपण पोहचवु अशी ग्वाही आझाद खान या प्रसंगी दिली.आझाद खान यांनी आज पर्यंत अक्षर मानव संघटनेत अनेक वेगवेगळ्या पदांवर काम पाहिले आहे त्यांना सामाजिक कामाचा महाराष्ट्रभरातिल भौगोलिक क्षेत्राचा त्यांना चांगला अनुभव आहे. तसेच आजपर्यंत अनेक बेरोजगारांना, युवकांना तसेच कुटुंबाला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, अश्या एकनाअनेक विषयावर सल्लागार म्हणून मार्गदर्शन केले आहे.असे अक्षर मानव संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्रीकांत डांगे, भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष अजिंक्य किन्हिकर, राज्य अध्यक्ष प्रा. प्रविण जावळे, राज्य उपाध्यक्ष दिपेश मोहिते तसेच सर्व राज्यांचे मुख्य पदाधिकारी, अमरावती जिल्हा कार्यकारिणी व, तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारींनी शुभेच्छा दिल्या. मुळचे तिवस्याचा रहिवासी असलेल्या सर्वसाधारण परिस्थितीतुन समाजकार्य करणाऱ्या आझाद खान यांची राज्यस्तरीय संघटक पदी निवड झाल्याने अमरावती जिल्हाभरातुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.