
चांदुर बाजार फिजिकल अकॅडमी व श्री हनुमान क्रीडा मंडळ मधील खेळाडू
चांदुर बाजार/ एजाज खान
स्पर्धा युगामध्ये खेळ म्हटला का मेहनत परिश्रम आले असाच एक अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील चांदूरबाजार फिजिकल अकॅडमी व श्री हनुमान क्रीडा मंडळ येथील जिद्दी व परिश्रमाने शिखर गाठणारा जिगरबाज खेळाडू चि अनुज कमल चौधरी यांची एशिया युथ गेम्स इंडिया कॅम्प मध्ये इंडिया कबड्डी संघात निवड झाली आहे ही चांदुर बाजार मधील सर्वांना अभिमान असलेली बाब आहे दिवस रात्र मेहनत करून त्याने हे यश संपादन केले आहे गो सी टोम्पे महाविद्यालय येथे तो सराव करत होता त्याच्या मेहनतीने व परिश्रमाने त्याने चांदूरबाजार चे नाव उंचावले आहे त्याची ही निवड उत्तराखंड येथे झालेल्या नॅशनल कबड्डी स्पर्धा मध्ये करण्यात आली होती तो विदर्भ कबड्डी संघ चे प्रतिनिधित्व करत होता त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे मन आकर्षित केले होते तो या आदी दोन वेळा नॅशनल, खेलो इंडिया , मध्ये महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधित्व करून त्याने महाराष्ट्राला विजेता करून दिले होते तर तो चांदुर बाजार येथील फिजिकल अकॅडमी व श्री हनुमान क्रीडा मंडळ मधील खेळाडू असून त्याने अनेक ग्रामीण भागातील कबड्डी स्पर्धेत संघाला विजते पद पटकावून दिले आहे त्याच्या या यशाने त्याचे पूर्ण विदर्भामध्ये कौतुक होत आहे या सर्वांकरिता इंडिया सेक्रेटरी व विदर्भ अम्युचर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री जितेंद्रसिंह ठाकुर, सचिव अशोकराव देशमुख, सहसचिव सतीश डफळे यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाडू ची निवड करण्यात आली आहे तर तो आज प्रो कबड्डी संघ पटना पायलेट यांचे प्रशिक्षण कॅम्प घेण्याकरीता पुणे येथे रवाना होत आहे तर पुढचा इंडिया कॅम्प सुद्धा करिता त्याला जायचे आहे त्याच्या या यशाने गो सी टोम्पे महाविद्यालयाचे अध्यक्ष भास्करराव टोम्पे, सचिव विजयराव टोम्पे, आनंद उर्फ टिकू अहिर अध्यक्ष श्री हनुमान क्रीडा मंडळ,मनोज कटारिया समाजसेवक विनोद कोरडे,जीवन जवंजाळ,अतुल रघुवंशी,लखन चौधरी,भूषण अहिर,जेष्ठ पत्रकार सुरेश सवळे,पत्रकार सागर सवळे,सुयोग गोरले राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक,अक्षय श्रीराव,सुमित घोम क्रीडा मार्गदर्शक सनी चिखले,आदित्य वानखडे,ऋषिकेश पोहकार,सुजल अहिर,प्रणव ठाकरे,ऋषीकेश तिवाडे,ओम नाकाडे,भूषण राऊत,अभि पवार , साहिल भगत,यश धोमणे,संजोग लांडे,उमेश बसिने,अंकित झुंनगरे , व अम्युचर कबड्डी असोसिएशन सर्व पदाधिकारी ,हनुमान क्रीडा मंडळ, जगदंब कबड्डी मंडळ गो सी टोम्पे कॉलेज,पत्रकार संघटना व सर्व क्रीडाप्रेमी मित्रपरिवार सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या