तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली प्रक्रिया
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राह्मणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतमध्ये कोणत्या प्रवर्गातील कोणते सरपंच असतील हे निश्चित करण्यात आले आहे या सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण या प्रवर्गातील सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 68 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत 8 जुलै रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात काढण्यात आली यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 12 अनुसूचित जमाती 2 तर नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता 18 व सर्वसाधारण खुला प्रवर्ग म्हणून 36 अशा एकूण 68 ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत विशेष भूसंपादन अधिकारी प्रसन्नजीत चव्हाण व तहसीलदार अश्विनी जाधव नायब तहसीलदार मुलमुले निवडणूक विभाग मंडळ अधिकारी मंगेश माकडे यांच्या उपस्थितीत काढण्यात येऊन सहाय्यक म्हणून नाझर अमोल दारोडकर मंगेश गावनेर धीरज वर्मा यांनी सहकार्य केले यामध्ये अनुसुचीत जाती करिता सिद्धनाथ पुर खुला, जामगाव महिला ,सेलू गुड खुला, नादसावंगी महिला, धानोरा गुरव खुला ,वाघोडा महिला, कोठोडा खुला ,शिवनीरसुलापूर महिला ,मंगरूळ चव्हाळा महिला ,येरडगाव खुला, रोहना खुला ,शिरपूर महिला
अनुसूचित जमाती जावरा खुला ,हिवरा बु महिला. नागरिकांचा मागास प्रवर्ग टाकळी बु महिला, धानोरा फसी महिला ,खानापूर महिला, वाटपूर महिला ,सातारगाव महिला ,पिंपळगांव बैनाई खुला, पहूर खुला ,सुलतानपूर खुला ,कोहळा जटेश्वर महिला ,लोहगाव महिला ,पिंपरी गावंडा खुला, कणी मिर्जापुर खुला, खिरसाणा ईश्वर चिट्ठी खुला, फुबगांव खुला, खेड पिंपरी खुला ,काजना खुला ,आडगाव बु महिला, पळसमंडळ महिला.सर्वसाधारण प्रवर्ग् येवती खुला, पिंपरी निपाणी खुला, कोदरी खुला ,दाभा खुला, सारसी खुला ,धानोरा शिखरा खुला, चिखली वैद्य खुला, खंडाळा खुर्द महिला ,मांजरी मसला महिला, कंझरा महिला, फुलामला महिला, पिंपळगांव निपाणी महिला ,वडाळा महिला, वेणी गणेशपुर खुला, येणस महिला, जळू ईश्वरचिट्टी खुला, बेलोरा हिरापूर महिला, पुसनेर महिला, धामक महिला, पाळा महिला, भंगुरा खुला, वडूरा महिला, मोखड महिला, पापळ खुला, साखरा खुला, लोणी खुला, शिवरा खुला, वाढोणा रामनाथ महिला ,माहुली चोर महिला, शेलु नटवा खुला, दहिगाव महिला, सालोड खुला, ढवलसरी महिला ,सावनेर खुला, बेलोरा धामक खुला ,जनुना महिला याप्रमाणे 68 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली.
