
डेंग्यू,मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमित साफसफाई तसेच जनजागृती आवश्यक
अन्यथा करणार मनपावर हल्लाबोल आंदोलन
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
अमरावती महानगरपालिकेत झोन वाईज साफसफाई कंत्राट दिल्यापासून शहरात साफसफाई व्यवस्थित होत नसून नागरिक त्रस्त झाले आहे मनपा साफसफाईवर लाखो रुपये खर्च करते एका झोनचा खर्च सुमारे 45 लाख रुपये आहे ट्र्कने कचरा उचलने मोठे नाले सफाई चा खर्च वेगळा करोडो रुपये खर्च करून पाहिजे त्या प्रमाणात शहरात साफसफाई होतांना दिसत नाही पन्नालाल बगीच्या , पन्नालालनगर , बालाजी प्लॉट , देवदत्तनगर ,देशपांडे वाडी ,माधवनगर , स्व.वसंतरावनाईक नगर, मारोतीनगर , नमुना ,तुळजागीर वाडा यासह अनेक भागात नागरिकांच्या घरासमोर नाली आहे त्यांची साफसफाई नियमित न झाल्यास नागरिकांना मोठा त्रास होतो तसेच नाली काढल्यानंतर तात्काळ गाळ उचलणे आवश्यक आहे कचरा नियमित उचलणे आवश्यक आहे पावसाळ्याचे दिवस सुरू आहे नियमित साफसफाई न झाल्यास डेंग्यू , मलेरिया रुग्नांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते शहरात डेंग्यू , मलेरिया चे प्रमाण वाढू नये मनुन मनपा तर्फे जनजागृती आभियान राबविणे आवश्यक आहे बंद असलेली मच्छर प्रतिबंधक फवारणी सुरू करणे आवश्यक आहे मनपाने स्वच्छता विभागातील प्रत्येक प्रभागातील कंत्राटदार , स्वच्छता अधिकारी , स्वास्थ्य निरीक्षक , सुपरवायजर यांचे मोबाईल नंबर जनतेसाठी सार्वजनिक करावे झोनवाईज कंत्राट मध्ये साफसफाई व्यवस्थित होत नसून ते रद्द करून वार्ड वाईज करावे तरी मनपाने साफसफाई विषय हा गांभीर्याने घेवून त्यावर तातडीने उपाय योजना करावी अन्यथा जनतेला सोबत घेऊन मनपावर हल्लाबोल आंदोलन करणाचा ईशारा मनपाचे माजी स्थायी समिती सभापती तसेच “”संघर्ष”‘ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद बांबल यांनी दिला आहे.