
माहुली जहांगीर सौर प्रकल्पातून जिल्ह्यातील २२०० शेतकऱ्यांसाठी झाली दिवसा वीजेची सोय
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
जिल्ह्यातील माहुली जहागीर येथे मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेतील ५ मेगावॅट क्षमता असलेला नविन सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.त्यामुळे परिसरातील २ हजार २०० शेतकऱ्यांना दिवसा विजेची सोय झाली आहे. या योजनेत सुरू झालेले जिल्ह्यातील हे तीसरे सौर प्रकल्प असून याअगोदर उसळगव्हाण (देवगाव उपकेंद्र) आणि जळगाव मंगरूळ (मंगरूळ दस्तगीर उपकेंद्र) हे ६ मेगावॅट क्षमतेचे दोन सौर प्रकल्प सुरू झाले आहे.शेतकऱ्यांना शाश्वत आणि दिवसा वीज देण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना २.०, राबविण्यात येत असून राज्यात या योजनेला महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली ,तसेच विदर्भात प्रादेशिक संचालक परेश भागवत यांच्या मार्गदर्शनात गती देण्यात आली आहे.विकेंद्रीत स्वरूपाचे सौर प्रकल्प उभारायचे आणि त्या प्रकल्पाच्या माध्यनातून निर्मिती होणारी वीज महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्राला जोडून त्या माध्यमातून त्या उपकेंद्रातून वीज पुरवठा होणाऱ्या शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे असे या योजनेचे स्वरूप आहे.जिल्ह्यात या योजनेअंतर्गत महावितरणच्या ४१ उपकेंद्रासाठी ४४ ठिकाणी सौर प्रकल्प उभारण्यात येत असून ,या माध्यमातून १८४ मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे.माहुली जहागीर सौर प्रकल्पाची क्षमता ५ मेगावॅट असून २५ एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात आला आहे. मे.व्ही.व्ही.के.आर फोटोव्होलटाईस एनर्जी या विकासकामार्फत उभारण्यात आलेल्या या सौर प्रकल्पातून निर्मिती होणारी वीज ३३ केव्ही माहुली जहागीर उपकेंद्राच्या माध्यमातून परिसरातील २ हजार २०० शेतकऱ्यांना दिवसा देण्यात येणार आहे. जिल्ह्यात या प्रकल्पासहीत तीन सौर प्रकल्पाच्या माध्यमातून ५ हजार २०० शेतकऱ्यांना आता दिवसा वीजेची सोय झाली आहे.माहुली जहागीर सौर प्रकल्प सुरू करण्यात आले.यावेळी उपस्थित मुख्य अभियंता अशोक साळुंके,अधीक्षक अभियंता दिपक देवहाते,कार्यकारी अभियंता प्रफूल लांडे उपस्थित मान्यवर