
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आयोजन!!
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
राजर्षी छत्रपती शाहु महाराज जयंती दिनी २६ जुन २०२५ गुरुवार रोजी महाराष्ट्रभर पक्षाच्या सर्व शाखा स्तरावर जातीय सलोखा व लोकशाही रक्षण दिन साजरा करण्याचा निर्णय राज्य कमेटीने घेतला. शाहु महाराज यांनी ज्या पद्धतीने जातीय सामाजीक सलोख्याचा आदर्श महाराष्ट्र राज्याला दिला तो सामाजीक सलोखा महाराष्ट्र राज्यातुन हद्दपार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. श्याम शिंदे यांनी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरुषोत्तम आंधळे व प्रमुख पाहुणे बाबा भाई हे मंचावर उपस्थित होते. म्हणून जातीय सामाजिक सलोखा निर्माण व्हावा याकरिता मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी नांदगांव खंडेश्वर यांचे वतिने सद्भावना चौक झोंबाडीपुरा येथे सहभोजन व सहविचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होतेव मोठ्या प्रमाणात सहभोजन सह विचारास सहभागी होऊन आनंद घेतला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तालुका सचिव कॉ. शाम शिंदे, शहर सचिव मोहसीन शेख, ज्ञानेश्वर शिंदे, रामदास मते, अनिल मारोटकर, दिलीप महल्ले, अशोक केसरखाने, विजय पाटील, पुरुषोत्तम आंधळे, शाकीर भाई, गजानन चिंचे, दीपक अंबाडरे, राजेंद्र राऊत, मारोतराव बंड, लक्ष्मण झिमटे, अंकुश शिंदे, चैतन्यराज साळवान, किशोर शिंदे, प्रतीक सुने, मोहीम खान, मला वैरागडे, प्रांजली शिंदे, मोनाली शिंदे जयश्री शिंदे, पूजा शिंदे, मीरा कुंभरे यांच्यासह आदी उपस्थित होते.