
जेवणाच्या ताटातील लज्जत वाढविणारे लोणचं.
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
दररोजच्या जेवणाची लज्जत वाढण्यासाठी कैरीच्या लोणच्याला विशेष पसंती दिली जाते. लिंबु, आवळा, या सह विविध प्रकारची बाजारासह आनलाईन वरून घरी पोहचली जाते. ती केव्हा ही बाजारात उपलब्ध होतात. मात्र कैरीचे लोणचे हंगामी असून में, जुन मध्ये लोणचे कैरीचा हंगाम असतो. वर्षभर लोणचे पुरेल या पद्धतीने तयार केले जाते. ते वर्षभर टिकवण्यासाठी महिला सर्व पद्धती चे पालन करून नियोजन करतात. यंदाच्या वर्षी कैरी, तेल आणि मसाल्याच्या किंमतींत मोठ्या प्रमाणात वाढल्याने घरगुती लोणचं बनवायला दुप्पट खर्च येत आहे. त्यामुळे यावर्षी लोणचं बनवायची की नाही, असा प्रश्न महिलांना पडला आहे. जेवणाच्या ताटातील लज्जत वाढविणारा पदार्थ म्हणजे लोणचं. मात्र, हेच घरगुती लोणचं बनवण्यासाठी यंदा महिलांना दुप्पट खर्च करावा लागत आहे. यंदाच्या वर्षी कैरीच्या किंमतींत वाढ झाली आहे. मागील वर्षी 40 रुपये किलो मिळणाऱ्या कैरीसाठी यावर्षी 70 रुपये मोजावे लागत आहे. तसेच, तेलाच्या आणि मसाल्याच्या किंमती देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याने यंदा घरगुती लोणचं बनवण्यासाठी दुप्पट खर्च येत.बाजारात विविध प्रकारचे लोणचे मिळत असले, तरी गृहिणींचा घरी लोणचं तयार करण्याकडे कल असतो. हे लोणचं वर्षभर टिकते व ते जसे जसे मुरते तसं त्याची चव वाढत जाते, असा अनेक महिलांचा विश्वास आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लोणचं तयार करण्यासाठी महिलांची लगबग दिसून येते. कैरी पासून घरगुती तिखट, गोड लोणच्या बरोबर गूळ आंबा, साखर आंबा ही तयार केला जातो.लोणच्याच्या दरांत वाढ झाल्याने गृहिणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतात.
कैऱ्या मिळतात फोडून
लोणच्यासाठी कैरीच्या बारीक फोडी कराव्या लागतात. सुरुवातीला कैऱ्या फोडण्यासाठी घरी आंबेफोडी होत्या मात्र त्या काळाच्या ओघात लुप्त झाल्या. आता अनेक विक्रेते कैऱ्या फोडून देतात, त्यासाठी किलोला 10 ते 20 रुपये आकारले जाते, त्यामुळे वेळ वाचत असल्याने अनेक गृहिणी विक्रेत्यांकडून कैऱ्या फोडून घेतात.
आदिवासी भागातील कैऱ्याना मागणी
लोणच्यासाठी आदिवासी भागातून येणाऱ्या गावठी कैऱ्याना महिला पसंती देत असतात. त्या चवीला आंबट असतात शिवाय त्याचे लोणचे वर्षभर चांगला राहते, असा अनेक महिलांचा विश्वास आहे. त्यामुळे यावर्षी या कैऱ्यांची मागणी देखील वाढली आहे.
घरगुती लोणच्याला मागणी
यंदाच्या वर्षी कैऱ्यांची किंमती वाढल्या आहेत. तसेच, तेल आणि मसाल्याच्या किंमती देखील वाढल्याने लोणचे महागले आहे. जिथे ग्राहक दरवर्षी दोन ते तीन किलो लोणचे घेत होते, ते ग्राहक आता एक किलो लोणचं घेत आहे. यामुळे मागणी घटली आहे. पण, तरीही बाहेरील लोणच्या पेक्षा घरगुती लोणच्याला अधिक मागणी आहे. हे लोणचं चवीला चांगले असून, वर्षभर टिकत असल्याचं गृहिणीने सांगितले आहे.