
तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष २०२५- २०२६ साठी ३ वर्षे कालावधीच्या पूर्णवेळ पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान / वास्तुकला अभ्यासक्रमाच्या प्रथम प्रवेशप्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनायाकडून जाहीर करण्यात आले आहे. याकरिता विद्यार्थ्यांना आगामी १६ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार होते.शैक्षणिक कागदपत्र जुळवाजुळव अडचण लक्षात घेऊन पालक व विद्यार्थी यांना नोंदणी करिता एक आठवड्याची मुदत वाढ देण्यात आली आहे.इयत्ता दहावीचा निकाल दिनांक १३ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाल्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून २० मे पासून http: poly 25 Dtemaharashtra.Gov. in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रवेश अर्ज
भरण्यासाठी येणाऱ्या
अडचणींचाबत विद्यार्थ्यांना काही तक्रार असल्यास ती दूर करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून ७६६९१००२५७ /१८००३१३२१६४ हा मदत क्रमांक सुरु करण्यात आला आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत त्यावर संपर्क साधता येईल. ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रति अपलोड करणे ही प्रक्रिया दिनांक २० मे ते २५ जून यादरम्यान पार पडणार आहे. तसेच कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चित्ती करणे ही प्रक्रिया दिनांक २० मे ते २५ जून दरम्यान पार पडणार आहे. विद्यार्थ्यांचा वाहता प्रतिसाद लक्षात घेता प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक २०२५- २०२६ मध्ये एक आठवडद्याची वाढ होण्याची शक्यता होतीच. सोमवार दिनांक १६ जून २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी या बाबतच्या सूचना पार पडलेल्या बैठकीत दिल्या आहे अमरावती स्थित शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रवेश प्रक्रियेला घेऊन या संधीचा फायदा विद्यार्थी व पालकांनी प्रवेश प्रक्रिया अधिकारी प्रा. हमीद शेख यांच्याशी ८०८७९२५४६८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. अतुल बोराडे यांनी केले आहे.
बहोत खास भाई