
काव्यमित्र संस्थेच्या वतीने मंजू ठाकरे यांचा राष्ट्रीय महिला समाज भूषण पुरस्काराने सन्मान
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
मागील पंचवीस वर्षापासून काव्य मित्र संस्था पुणे यांच्या वतीने विविध क्षेत्रात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,क्रीडा, आरोग्य, सेवा देणाऱ्या समाज बांधवांचा सन्मान करण्यात येतो.
2025 जिजाऊ ची लेक सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्रातील लावणी स्पर्धा अनेक वर्षापासून आयोजन करणारे अमरावती येथील धनश्री व सामाजिक प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सौ.मंजू ठाकरे जिजाऊ ची लेक यांना राष्ट्रीय महिला समाज भूषण पुरस्काराने काव्य मित्र संस्था पुणे यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले राष्ट्रमाता जिजाऊ स्मृती दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रविवार दिनांक 8 जून रोजी
तारांगण,सायन्स पार्क पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध लेखिका सौ सविता जंगम जुन्नर, तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ.प्रमोद लाड, मासिक अपेक्षाचे संपादक दत्ता उभे, नवी दिल्ली येथील लेफ्टनंट कमांडो राम शिंदे, लोकप्रिय आदर्श शिक्षक रोहन पंडित मावळ यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे मुख्य आयोजन काव्यमित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सगर यांनी केले तर सूत्रसंचालन सौ. शारदा पवार यांनी केले या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरी करणारे अनेक मान्यवर उपस्थित होते