
विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागात प्रवेश सुरू
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभाग 1994 पासून सुरू झाला असून महाराष्ट्र शासनाकडून विभागाला अर्थसहाय्य प्रदान करण्यात आले आहे. देशभरात नावलौकीक असलेल्या जैवतंत्रज्ञान अभ्यासक्रमाला हजारोंच्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेऊन आपले भविष्य घडवित आहेत व सध्या देशाच्या विविध नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थी कार्यरत आहेत, ही मोठी उपलब्धी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाने साधली आहे.जैवतंत्रज्ञान हा पदव्युत्तर अभ्यासक्रम दोन वर्षांचा असून नवनव्या संशोधनासह एम.एस्सी. अभ्यासक्रमात आण्विक जीवशास्त्र, जेनेटिक अभियांत्रिकी, बायोइन्फॉरमॅटिक्स, वनस्पती ऊती संवर्धन, बायोकेमिकल अभियांत्रिकी, किण्वन जीवशास्त्र, विश्लेषणात्मक तंत्रे, सेल जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, बायोकेमिस्ट्री यांसारख्या विविध शाखांमधील सिद्धांत आणि प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, औषध शोध, फायटोसेकंडरी मेटाबोलाइट्स आणि त्यांची जैवक्रियाशीलता, प्रथिन रचना विश्लेषण, कर्करोग जीवशास्त्र, आयपीआर, नॅनोटेक्नॉलॉजी यांसारख्या वैकल्पिक विषयांचाही समावेश आहे. तिस-या आणि चवथ्या सत्राच्या विद्याथ्र्यांना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून प्रकल्प दिले जातात. विभागाच्या प्राध्यापकांनी अनेक पेटंट्स दाखल केले असून त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. विभागात उत्कृष्ट संशोधन सुविधा उपलब्ध असून संशोधन करणा-या विद्याथ्र्यांना फेलोशिप्स मिळाल्या आहेत. विभागाव्दारे विविध प्रकल्पांवर काम करणा-या पोस्ट डॉक्टरल फेलोंना पोस्ट डॉक्टरल संशोधनासाठी सुविधा पुरविल्या जातात आण्विक जीवशास्त्र, कम्प्यूटेशनल जीवशास्त्रात आवड असलेले अनेक विद्यार्थी ज्ञान-आधारित उद्योगांमध्ये यशस्वीरित्या कार्यरत आहेत. अनेक विद्याथ्र्यांनी कृषी-बायोटेक क्षेत्रात प्रवेश केला असून, अंकुर सीड्स नागपूर, जय बायोटेक पुणे, ड¬ू पाँट इंडिया हैदराबाद, माहिको जालना तसेच सेरम इन्स्टिट¬ुट, लुपिन, सन फार्मा, बायोलॉजिकल ई, इनटस, बायोफार्मा या सारख्या व्हॅक्सीन व बायोफार्मा कंपन्यांमध्ये ते रुजू झाले आहेत. तर संशोधनाची आवड असलेले विद्यार्थी जगभरातील मोठमोठ¬ा संस्थांमध्ये आपले स्थान निर्माण करीत आहेत. एवढेच नव्हे, तर भारतातील अग्रगण्य संशोधन संस्था आय.आय.एस.सी., बंगळुरू, आय.आय.एस.ई.आर, पुणे, आय.आय.एस.ई.आर. भोपाळ, आय.आय.टी. दिल्ली, एन.सी.सी.एस., आगरकर इन्स्टिट¬ुट, पुणे, एन.डी.आर.आय. हिसार, आय.आय.टी. मंडी या संस्थांमध्ये विद्याथ्र्यांनी प्रवेश मिळविला आहे.
प्रवेश पात्रता
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाद्वारे आयोजित प्रवेश परीक्षेस बसण्यासाठी विज्ञान, जीवशास्त्र किंवा कृषी, पशू वैद्यकीय आणि मत्स्य विज्ञान, फार्मसी किंवा बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी किंवा बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी किंवा समकक्ष परीक्षेत बॅचलर पदवीधर असलेले उमेदवार पात्र आहेत. प्रवेश क्षमता 20 असून प्रवेश परीक्षेद्वारे विद्याथ्र्यांना प्रवेश दिला जातो.