
तीन घरफोड्यांतील आरोपींंकडून ३.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
चांदूर रेल्वे / तालुका प्रतिनिधी
चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या तीन घरफोडीच्या गुन्ह्यांतील आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण ३,०६,८००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
दिनांक २१ मे २०२४ रोजी दाखल करण्यात आलेल्या गुन्हा क्र. ८५/२५, कलम ३०५, ३३१(३) भा.दं.सं. नुसार घरफोडी प्रकरणी पुढील आरोपींना अटक करण्यात आली होती –
१) सिमा उर्फ हेमा परवीन शेख नसीम
२) शेख नसीम शेख सलीम (दोघेही रा. सादिया नगर, अमरावती)
३) प्रफुल्ल सुधाकरराव पाठक (रा. सराफा बाजार, अमरावती)
अटकेनंतर सखोल चौकशी दरम्यान, आरोपी सिमा परवीन व शेख नसीम यांनी चांदूर रेल्वे येथे अजून दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्या कबुलीची खातरजमा केली असता, गुन्हा क्र. ४१/२५ आणि ७८१/२४, दोन्ही गुन्हे कलम ३०५, ३३१(३) भा.दं.सं. नुसार दाखल असून, या प्रकरणांमध्येही त्यांनी घरफोडी केली असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींना २१ मे २०२४ ते २९ मे २०२५ दरम्यान पी.सी.आर रिमांडवर ठेवण्यात आले असून, तिन्ही घरफोड्यांमध्ये पोलिसांनी ८३ ग्रॅम सोने, ८३ ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम मिळून एकूण ३,०६,८००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणाचा तपास मा. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी (चांदूर रेल्वे विभाग) श्री. संतोष खांडेकर, पोलीस निरीक्षक श्री. अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शरद आहेर, पोउपनि सुयोग महापुरे, पोउपनि नंदलाल लिंगोट, पो.अं. प्रशांत ढोके, प्रदीप पाटील यांनी केला.
अमरावती ग्रामीण भागातील इतर पोलीस स्टेशनमध्येही आरोपींविरुद्ध कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहे.
चांदूर रेल्वे पोलिसांच्या तडफदार कार्यवाहीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.