
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
पंचायत समिती अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत पात्र कुटुंबांचे सर्वेक्षण संपूर्ण तालुक्यात सुरू झालेले आहे. या योजनेच्या माध्यमातून बेघर, कच्ची घरे असणारे, भाड्याने राहणारे तसेच स्वतःचे पक्के घर नसणारे अशा सर्व पात्र लाभार्थीची नवीन यादी तयार करण्यात येत आहे.आवास प्लस सर्वेक्षण २०१८ मध्ये प्रतीक्षा यादीत समाविष्ट न झालेले आणि सिस्टीमद्वारे अपात्र ठरलेले, परंतु सध्याच्या निकषांनुसार पात्र असणाऱ्या कुटुंबांचा या सर्वेक्षणात समावेश केला जाईल. यासाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती डॉक्टर स्नेहल शेलार यांनी सर्व संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सुटलेल्या लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतला संपर्क साधून आपले नाव यादीमध्ये समाविष्ट होण्याकरिता ग्रामपंचायत अधिकारी यांना भेट देऊन नाव समाविष्ट करण्याकरता सहकार्य करावे.या सर्वेक्षणाद्वारे पात्र लाभार्थीची नवीन यादी तयार करून त्यांना योजनेत सामावून घेण्याचे नियोजन आहे.या संधीचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील सर्व बेघर, कच्च्या घरात राहणारे, भाड्याच्या घरात वास्तव्य करणारे तसेच स्वतःचे पक्के घर नसणारे लाभार्थी यांनी आपली नावे नोंदणी करण्याचे आवाहन डॉ.स्नेहल शेलार गटविकास अधिकारी यांनी केले आहे.
यासाठी लाभार्थीनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधून नावनोंदणी करावी. नावनोंदणी केल्यानंतर सर्वेक्षणाद्वारे त्यांची पात्रता तपासून यादीत समावेश करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना या सर्वेक्षणात सक्रिय सहभाग घेऊन लाभार्थीची माहिती संकलित करण्याचे आणि योजनेचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन गटविकास अधिकारी श्रीमती डॉक्टर स्नेहल शेलार सहाय्यक गटविकास अधिकारी श्री संजय झंझाड विस्तार अधिकारी श्री.विठ्ठल जाधव निलेश ठाकरे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक श्री विजय आळणे श्री निलेश खडसे श्री अंकित पिंजरकर डाटा एन्ट्री ऑपरेटर मनीष मदनकार ग्रामीण गृहनिर्माण अभियंता हितेश लांडे विकी रत्नपारखी खुशाल कापसे अक्षता जळीत वैष्णवी देशमुख यांनी केले आहे.
ही घरे होणार अपात्र.