
अमरावती जिल्हा सचिव राहुल वानखडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान.
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
अपंग जनता दल ही एक सामाजिक संघटना असून या संघटने मार्फत जिल्ह्यातील अपंगांना हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य सुरु आहे. त्याच प्रमाणे अपंगांना वेळोवेळी मदत करणारे व अपंगांच्या भावना समजून घेणारे श्री. विजय टेळे यांची नियुक्ती अमरावती जिल्हा सचिव श्री. राहुल वानखडे यांच्या हस्ते नांदगाव (खंडे.) तालुका अध्यक्ष पदी केली असून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.या वेळी हरिहर चौधरी, राजेश पवार, राजू कुसराम, अंकुश राऊत, वर्षा सहारे, श्रीकृष्ण राऊत, कांचन कुकडे, शीतल पटोकार, प्रमोद शेबे,अजय कुसराम, मयूर मेश्राम, जय कुमार रुपने ज्योती देवकर, सरोज पुनसे व संतोष टेळे हे प्रमुख उपस्थित होते.