
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक धार्मिक स्थळांचा जीर्णोद्वार केला-संजय आठवले
सामान्य रुग्णालयात रुग्णांना आणि अंध विद्यालयांमध्ये दिव्यांगांना फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्च्याच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीच्या निमित्ताने भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच दिशा निर्देशानुसार मंगळवार दिनांक 27 मे ला दुपारी 12 वाजता सामान्य रुग्णालय अमरावती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.आणि त्याच दिवशी 27 मे ला सायंकाळी 5 वाजता अंधविद्यालय जेल कॉटर अमरावती येथील दिव्यांगांना फळ वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले. आहे. अशी माहिती भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा सरचिटणीस संजय आठवले यांनी दिली आहे.
भाजपा मुख्य कार्यालयामध्ये आयोजित बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा सरचिटणीस संजय आठवले म्हणाले की राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण भारतामध्ये अनेक मंदिरे बांधली आणि अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या कुशल व यशस्वी कारकिर्दीमध्ये धार्मिक कार्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले.आणि नागरिकांना धार्मिक कार्यासाठी प्रोत्साहित केले. त्या उत्कृष्ट समाज सुधारक व यशस्वी न्यायनिवाडा करण्यामध्ये प्रारंगत होत्या. महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता तसेच महिलांच्या न्याय हक्कासाठी महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांची निरंतर प्रगती व्हावी यासाठी सातत्याने कार्य केले. समाजातील अनिष्ट चालीरीती व वाईट रूढी परंपरा सुधारण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दूरदृष्टीच्या उत्कृष्ट कुशल समाज सुधारक होत्या त्यांनी आपला राज्य कारभार चालविताना महिलांना सक्षम व आत्मनिर्भर बनविण्यासाठी अथक प्रयत्न केले.असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा सरचिटणीस संजय आठवले यांनी या बैठकीमध्ये केले.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या नियोजन बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे अध्यक्ष मिलिंद बांबल यांच्यासह शहर जिल्हाध्यक्ष डॉ.धनराज चक्रे, प्रदेश सचिव प्रमोद खंडारे अनुसूचित जाती मोर्चा शहर जिल्हा सरचिटणीस संजय आठवले, जोगेंद्र दहातोंडे, सदानंद चोरपगार, रवी पारवे,सरला ताई गडलिंग, अनिलभाऊ खडसे, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.