
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
शाळेने 100% निकालाची परंपरा कायम राखत कु.अधिश्री फुटाणे आणि पूनम काकडे यांनी 98% गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर गौरी भटकर 97% गुणांसह द्वितीय आली आहे.
नुकताच जाहीर झालेल्या इयत्ता १० वी च्या निकाल मधे कु. धनिष्ठा निलेश मंडे हीने ९६.४०% गुणांसह घवघवित यश संपादन केले आहे. तिची आई गृहिणी असून वडील महानगर पालिकेत आहेत. तिचे मुळगाव जगतपुर असून ते नांदगाव पासून २५ किमी पुढे यवतमाळ जील्याचे सीमेवर आहे. तिथे फक्त प्राथमिक शाळा आहे. ती या यशाचे श्रेय आई कल्पना, वडील निलेश आणि शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांना आणि मार्गदर्शकांना देते.
तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
तिच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक कविता केवटकर, वर्गशिक्षक नुझत शेख, सर्व शिक्षक सारिका देशमुख, संगिता ठाकरे, शुभम केवटकर, रचना चिरडे, फिरोज घारड, आजी ताराबाई मंडे, सत्यवान मंडे, सुरज मंडे, संगिता मंडे, अर्चना मंडे, भूषण मंडे, असित मंडे, श्रविका मंडे, अस्मिता मंडे, क्रिश मंडे, सिद्धार्थ गेडाम, प्रवीण गेडाम, मिलिंद दहाट, रुपेश बनसोड, संदीप मेश्राम, रवींद्र चवरे, सुदाम बोरकर आणि परिवारातील सदस्य, नातलग व मित्रमंडळीन्नी अभिनंदन व कौतुक केले आहे.