प्रा.सोळंके यांच्या आर्थिक योगदानातील एक शैक्षणिक सामाजिक स्तुत्य उपक्रम
अक्षर मानवचे राज्य संघटक श्री आझाद खान उपक्रमाला आवर्जून उपस्थित
तिवसा/तालुका प्रतिनिधी
स्थानिक’ कुऱ्हा गावालगत गेल्या अनेक वर्षापासून वैदू समाज पालं टाकून बिकट समस्येत कसाबसा जगण्याकरिता उपजीविका करीत आहे. वैदू समाजाचा परंपरेने चालत आलेला जडीबुटी औषध विक्रीचा व्यवसाय मागे पडल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
कुऱ्हा ता. तिवसा, जिल्हा अमरावती येथे गावालगत पाले टाकून असलेल्या या समाजाला आजही शिक्षण रोजगार, रोजगार, सुरक्षा, पाणी,या गंभीर समस्यांशी सामना करावा लागत आहे. वैदू समाजाच्या या पालांमध्ये वीज व इतर सुविधां मिळणे कठीण असल्याने आव्हानात्मक जीवन जगत आहेत आहे. व शैक्षणिक सुविधा व विकासाच्या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. हे लक्षात घेऊन त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते मा.प्रा .चरणदास सोळंके अध्यक्ष श्री संत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था अमरावती व संचालक, हुम्यानिटी मल्टीपर्पज फाउंडेशन, यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमाने या पालामध्ये शैक्षणिक संस्कार वर्ग सुरू केलेला आहे. याकरिता ते स्वखर्चाने विद्यार्थ्यांना लेखन शैक्षणिक साहित्य पूरवतात.

या लेकरांना शिकविणाऱ्यांकरिता ब्लॅकबोर्ड, खडू, डस्टर, व शक्य ते मानधन इ सुविधा उपलब्ध करून देत आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांना संस्काराचे धडे देण्यावर सुद्धा भर दिला जात आहे.मुलांना शिकवण्याच्या या कार्याकरिता याच वैदू समाजातील श्री योगेश शिवरकर हे सूर्या शीवरकर, पृथ्वीउर्फ छोटू शिवरकर, करण शिवरकर ,यांच्यकडून अध्यापन करून घेतात. यांना काला गोटा येथील कांचन भोसले (डी.एड.) अध्यापनाचे काम करीत आहे. तसेच तिवस्यातील मुळ रहिवासी अक्षर मानवचे राज्य संघटक श्री आझाद खान हे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते. ते सतत मानवी हिताचे उपक्रम राज्यभर घेत राहतात तसेच आमच्या तिवसा तालुक्यात अनेक पालावर विकासाच्या वाटेवर संयुक्त विद्यमाने ते मार्गदर्शन देत आहेत.दिनांक 19/11/2026 रोजी तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथील पलावर भेट देऊन उपक्रम घेण्यात आला येथे अल्पोपहार व शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले. वैदू समाजाच्या या पालातील सामाजिक व शैक्षणिक विचाराचे लक्ष्मण शिवरकर ,तनया अंभोरे ,राजा पचारे, हे कार्यकर्ते सहकार्य करीत आहेत. आपल्या समाजातिल लेकरांचा शैक्षणिक विकास व्हावा, हाच त्यांचा प्रामाणिक उद्देश आहे.
