राष्ट्रीय आंबेडकरी कलावंत प्रबोधन परिषदेद्वारा निशुल् एक रविवार एक विहार.
लोकजागर परिवर्तनाचा उपक्रमाची समाजाला गरज.
अमरावती ( जिल्हा प्रतिनिधी)
भारतीय समाजाच्या संपूर्ण इतिहासाला नवीन दिशा देणाऱ्या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा स्वीकारली होती. या ऐतिहासिक घटनेला यंदा 70 वर्षे पूर्ण झाली आहेत. ही केवळ धर्मांतराची घटना नव्हती,
तर समाजात पसरलेली जातीय विषमता यासह अस्पृश्यता आणि सामाजिक अन्यायाविरोधात उभारलेली स्वाभिमानाची वैचारिक क्रांती होती असे ठाम प्रतिपादन अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याणविभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या राज्यपाल माजी नामित सिनेट सदस्य, खाजगी सचिव व हिंदुस्थान स्काऊट अँड गाईडचे निवासी आयुक्त डॉ. मनिष शोभा शंकरराव गवई यांनी केले.

ते राष्ट्रीय आंबेडकरी कलावंत प्रबोधन परिषदेद्वारा निशुल्क एक रविवार एक विहार, लोकजागर परिवर्तनाचा प्रसार संविधानाचा उपक्रमाअंतर्गत शिंगणापूर येथील जाहीर सभेत बोलत होते. .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कवी, क्रांतिभुषण खडसे, प्रमुख मार्गदर्शक प्रबोधनकार, कवी, विशुद्धानंद जवंजाळ., प्रमुख अतिथी, म्हणून कुमार गौरव उर्फ दादू इंगळे, महेश आहेर, गजानन गेडाम, उत्तम राऊत शुभांगीताई वानखडे (उपाध्यक्षा रा. आ. क. प्र. परिषद.,)उमाताई जवंजाळ (सा. का व अध्यक्षा योगा कर्मचारी युनियन,) उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरवात तथागत बुद्ध, बोधिसत्व डॉ, बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून क्रांतिभुषण यांनी लिहिलेल्या गीतांनी ‘फुले शाहूं कबीर त्या गौतमाला’ महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक विलास सिरसाट यांच्या गीताने करण्यात आली याप्रसंगी आपल्या प्रबोधनपर मार्गदर्शनात डॉ गवई पुढे म्हणाले कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकले आणि परदेशातच राहू शकले असते.

मोठे वकील, मोठा पगार. पण ते परत आले. का? कारण त्यांनी सांगितले “जे शिक्षण समाजाच्या उपयोगी पडत नाही, ते शिक्षण व्यर्थ आहे.”बाबासाहेबाचे नऊ भाषावर प्रभुत्व, चौसष्ट विषयांचे तज्ञ् तब्बल बत्तीस पदव्या जगात आजपर्यंत एवढ्या पदव्या कुणालाच नाहीत. त्यांनी पाण्याचा सत्याग्रह, मंदिर प्रवेश, पुणे करार, भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान, आर बी आय ची स्थापना, कामगारांचे आठ तास कामाचे अधिकार, स्त्रियांना सामान हक्क सर्वांच्या हक्कासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केले. सर्वात मोठी धम्मक्रांती त्यांनी विषमता आणि सामाजिक अन्यायाविरोधात उभारलेली स्वाभिमानाची वैचारिक चळवळ म्हणून केली जातिव्यवस्थेने निर्माण केलेली विषमता आणि अस्पृश्यतेचा अन्याया विरोधात बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केलाय. माणसाची प्रतिष्ठा जन्मावर नव्हे, तर त्याच्या मानवी अस्तित्वावर आणि मूल्यांवर आधारित असावी, हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. बौद्ध धम्माचा स्वीकार हा त्यांच्या दीर्घ वैचारिक प्रवासाचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. या निर्णयातून बाबासाहेबांनी समता स्वाभिमान, विवेक आणि नैतिकतेवर आधारलेल्या जीवनाचा मार्ग समाजाच्या समोर ठेवला. राष्ट्रीय आंबेडकरी कलावंत प्रबोधन परिषदेच्या तरुण कलावंताना एवढाच संदेश देतो की शिका -कारण शिक्षणशिवाय मुक्ती नाही. संघटित व्हा -ज्ञान वाटल्याने वाढते संघर्ष करा -ज्ञानाचे दुःख पचवून समाज जागा करण्याचे कार्य राष्ट्रीय आंबेडकरी कलावंत प्रबोधन परिषद एक रविवार एक विहार निशुल्क करत आहे.अशा उपक्रमाची समाजाला गरज असलयाचे देखील त्यांनी प्रतिपादित केले.याप्रसंगी कवी,क्रांतिभुषण खडसे, विशुद्धानंद जवंजाळ यांची देखील यथोचित भाषणे झाली.प्रबोधनानंतर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक,दीपक इंगळे,मिलिंद वानखडे, विजय गुडधे, मिलिंद गुडधे, विलास. अ.शिरसाठ,सुमितराजा सिरसाट,, या महाराष्ट्राचे लोकप्रिय गायकांनी आपल्या सुमधुर वानीने गीतांची मेजवानी सादर केली.महाराष्ट्राची लाडकी गायिका रुपाली वानखडे, संगीताताई राऊत, आशा मेश्राम यांनी’ ‘गीताने रंगत निर्माण केली.वाद्य संगीत,विलास शिरसाठ की बोर्ड ,सुबोध भगत बँजो ,प्रवीण किर्दक तबला,, प्रताप तायडे ढोलक . सर्व पाहुण्यांचा शॉल व पुष्प देऊन स्वागत शिंगणापूर ग्राम वासियांनी केले.कार्यक्रमाचे सुदंर सूत्र संचालन राजूभाऊ इंगळे यांनी केले आभार प्रदर्शन अस्मिता रौराळे यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन धम्मधरा महिला मंडळ शिंगणापूर, पंचशीला महिला मंडळ शिंगणापूर, सिद्धार्थ युवक मंडळ शिंगणापूर, सर्व उपासक उपासिका व सर्व शिंगणापूर ग्रामवासी शिंगणापूर.यांनी केले होते.
