रोजगार सेवकाकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वडूरा ग्रामपंचायत शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या सन 2024 -25 मध्ये विहिरीचे बांधकाम केले होते.सदर बांधकाम शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने केले आहे. अनेक शेतकऱ्यांनी सावकाराकडून उसनवार व व्याजाने रक्कम घेऊन विहिरीचे बांधकाम केले तसेच काही शेतकऱ्यांनी सोन्या चांदीची दागिने मोडतोड करून विहिरीचे बांधकाम केले आहे.परंतु दोन वर्षापासून वडूरा ग्रामपंचायत अंतर्गत शेतकरी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या निधीपासून वंचित आहेत
वडूरा ग्रामपंचायत येथील ग्रामस्थ यांनी गटविकास अधिकारी नांदगाव खंडेश्वर यांच्याकडे अनेकदा येरझारा मारल्या लेखी निवेदन दिले परंतु वडूरा ग्रामस्थांचे समाधान करण्याऐवजी त्यांना टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे गटविकास अधिकारी यांनी दिली.

वडूरा ग्रामपंचायत सरपंच महादेव ढोके आणि भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा अमरावती ग्रामीणचे उपाध्यक्ष संजय आठवले यांच्या नेतृत्वात धामणगाव रेल्वे विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्रताप दादा अडसड यांची भेट घेऊन वडूरा ग्रामस्थांच्या समस्या सांगण्यात आल्या आमदार प्रताप दादा अडसड यांनी वडूरा ग्रामस्थांची आस्थेने विचारपूस केली आणि तात्काळ दखल घेऊन संबंधित अधिकारी वर्गाला समस्या तात्काळ सोडविण्या याव्या यासाठी भ्रमणध्वनीद्वारे संबंधित अधिकारी यांना आदेश दिले.ग्रामपंचायत वडूरा येथील ग्रामस्थांसोबत आमदार प्रताप दादा अडसळ यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा अमरावती जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष संजय आठवले यांनी वडूरा ग्रामपंचायत सरपंच महादेव डोके प्रमोद लोंढे,जगदेव नवरंगे यांच्यासह सौ मीना आशुतोष म्हसतकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना ग्रामस्थांच्या समस्या सांगण्यात आल्या त्यांनी सुद्धा ग्रामस्थांचे यथोचित मार्गदर्शन करून समाधान करण्याचा प्रयत्न केला तांत्रिक अधिकारी कुसळे यांचे ऑनलाइन कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे तसेच रोजगार क्लर्क मीना म्हेसरे यांच्या दिशानिर्देशा वरून वडूरा ग्रामपंचायत येथील ग्रामस्थांचे कोणतेही ऑनलाइन काम करण्याचे तीनशे ते पाचशे रुपये प्रत्येकापासून रोजगार सेवक राजू काजे यांच्या माध्यमातून घेतले जात असल्याचा आरोप उपमुक्त कार्यकारी अधिकारी मीना म्हसतकर आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्रीमती सुरजे यांच्याकडे यावेळी वडूरा ग्रामस्थ यांनी केला वडूरा येथील रोजगार सहाय्यक राजू काजे यांच्याकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होणार नाही त्यांच्याकडून रोजगार सेवकामार्फत आगाऊ रक्कम घेतली जाणार नाही आणि सन 2024-25 पासून थकीत असलेली व अदा न करण्यात आलेली शेतकऱ्यांची मस्टर च्या कामाची रक्कम तात्काळ अदा करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीना म्हसतकर आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्रीमती सुरजे मॅडम यांनी वडूरा ग्रामपंचायत सरपंच महादेव ढोके भाजपा एससी मोर्चा अमरावती ग्रामीण उपाध्यक्ष संजय आठवले यांच्यासह उपस्थित वैभव अंबुलकर, राजु धानोरकर, जगदेव नवरंगे, प्रमोद लोंढे, विठ्ठल चोपकर, विनोद लोंदे , राजू कळंबे, रघुनाथराव वडुरकर, राजू ढेरे,विष्णू देठे, अतुल लोंदे दिनेश लोंदे या शिष्टमंडळाला दिले.
