बडनेराच्या खेळाडूं चे नेत्रदीपक सुयश
बडनेरा / प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचनालय,महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये फिजिकल फिटनेस व ट्रेनिंग सेंटरचे नियमित खेळाडू तसेच राजेश्वर युनियन हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय बडनेरा चे विद्यार्थी दीप निमगडे, (कराटे, किंकबॉक्सिंग) कु.विजया भजगवरे (कराटे) मयूर ब्राह्मणकर ( कराटे ), मनीबाई गुजराती हायस्कूल अमरावती चा विद्यार्थी अभय वावगे (वूशू ,किकबॉक्सिंग ) शोभाबेन सेठिया इंग्लिश स्कूल अमरावती चा अनिकेत गाले, (कराटे ),रामकृष्ण क्रीडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अमरावती ची विद्यार्थीनी मृगनयनी टूमरे (वूशू कराटे) यांनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट असे क्रीडा प्रदर्शन सादर करून प्रथम क्रमांक प्राप्त केला असून त्यांची अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धेकरिता निवड करण्यात आली.सदर सर्व विद्यार्थी हे सेंसाई सोनल रंगारी यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव करीतात.या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या या यशाचे श्रेय आपले पालक आई-वडील तसेच शाळेतील मुख्याध्यापक यांना दिले.यांच्या या यशाबद्दल त्यांचे क्रीडा शिक्षक श्री राघोते सर, राऊत मॅम, मंगेश व्यवहारे सर, जयंत मुंजे सर, स्वाती बाळापुरे मॅम,विवेक इंगळे सर, संजय मालविया सर यांनी तसेच शरीरातील सर्वत्र गणमान्य अतिथींनी यांचे अभिनंदन केले.
