
लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा विकास व्हावा त्यांना देशभक्ती चे धडे मिळावे, देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे क्रांतिकारकां बद्दल माहिती व्हावी म्ह्णून स्वातंत्र्यदिना निमित्त लालबहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शिवनी रसुलापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.*हर घर तिरंगा सप्ताह* साजरा करत असताना विद्यार्थ्यांना 150 वृक्षांचे वाटप करण्यात आले. तसेच चित्ररंगभरन स्पर्धा, पोस्टर प्रदर्शनी, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा,इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करून “एक पेड माँ के नाम“या उपक्रमा अंतर्गत शाळेच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात आले.15 ऑगस्ट 2025 ला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी प्राचार्य श्री. व्ही. डी. काळे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर रामपूर,शिवनी, रसुलापूर येथून प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरी दरम्यान विद्यालयातील विद्यार्थिनींनी *महिला सुरक्षा काळाची गरज* या विषयावर श्री. आर. एस. तुरणकर सर व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनात पथनाट्य सादर केले. *कु. युगा तिरमारे हिने भारत देश स्वतंत्र व्हावा* म्हणून ज्या क्रांतिकारकांनी,महापुरुषांनी आपले बलिदान दिले अशा महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकला. शिवनी गावी असणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याची पूजन व हार अर्पण करण्यात आले. सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून संविधान वाचन करण्यात आले. तसेच शिवणी येथील अण्णाभाऊ साठे चौकामध्ये प्रतिमा पूजन व हार अर्पण करण्यात आले.या ठिकाणी *कु. सानवी दहाड* हिने स्वातंत्र्य लढ्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांची योगदान व साहित्य यावर प्रकाश टाकला. प्रभात फेरी गावातून जात असताना रामपूर,शिवनी, रसुलापूर या गावातील लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला. भगतसिंग चौक येथे प्रभात फेरी पोहोचल्यानंतर गावातील “ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन” च्या सदस्यांनी प्रभात फेरीचे स्वागत केले व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला. या ठिकाणी विद्यालयाचे प्राचार्य तसेच गावकरी मिळून शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व *कु. राजश्री कळंबे* हिने शहीद भगतसिंग यांचे विचार यावर भाष्य केले. शहीद भगतसिंग सारखे देशभक्त या भारतातील प्रत्येक तरुण झाला तर भारताला सुवर्णकाळ लवकरच लाभल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन केले. प्रभात फेरीनंतर गावातील सरपंच सौ. सत्यकलाताई खडसे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्राचार्य तसेच पोलीस पाटील, गावातील सन्माननीय नागरिक,पालक, माजी विद्यार्थी यांच्या हस्ते विद्यालयच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.वर्ग सहा ते आठ च्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या कवायत सादर केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. एम. एन. सपकाळ सर , झेंडावंदन व कवायत संचालन श्री. एस. बि. राठोड सर, तथा प्रभात फेरी संचालन प्रा. श्री. एस. बि. पवार सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून आदरणीय श्री. अनिलदादा जवंजाळ, अध्यक्ष, लोकशिक्षण संस्था, अमरावती यांचे प्रोत्साहन लाभले. श्री. के. ए. नवले सर, श्री. एस जे. टुले सर, सौ. सि. पि. खरबडे मॅडम, श्री. एस. डी आत्राम सर, कु. एस. आर.मोटघरे मॅडम, प्रा. श्री. एस. ए. कसर सर, श्री. एम. एस. नाईक सर व शिक्षकेतर कर्मचारी श्री. व्ही. एस सोळंके, श्री. डी. ए. वासनिक, श्री. एन. एम. जाधव, श्री.व्ही. के. चोखट व वासतिगृह अधिक्षक श्री. सि. बि. निंभोरकर यांनी विशेष परिश्रम घेऊन संपूर्ण कार्यक्रम यशस्वी केला.
ही शाळा नक्कीच प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करीत आहे .. गावकरी मंडळींचे असेच सहकार्य मिळत राहो. पत्रकार महोदय आपण कार्यक्रमाची दाखल घेतली याबद्दल आपले आभार .