
हितेश शेळके यांची रोहित पवार फाऊंडेशन तालुका नांदगाव खंडेश्वर अध्यक्ष पदी नियुक्ती
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते हितेश शेळके यांची रोहित पवार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.डिसेंबर 2023 मधे युवा संघर्ष यात्रा आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वात पुणे ते नागपूर आयोजित करण्यात आली होती. ही पदयात्रा नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ, पापळ, धानोरा गुरव, फुबगाव मार्गे आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेत आमदार रोहित दादा पवार यांनी युवकांचे तसेच विद्यार्थ्यांचे ज्वलंत प्रश्न घेऊन लोकांमधे जनजागृती व्हावी या उद्देशाने आयोजित या पदयात्रेत हितेश शेळके व त्यांच्या सहकारी मित्र मंडळांनी सक्रियतेने आपला सहभाग नोंदविला होता. त्यांची राजकीय व सामाजिक जडणघडण बघता, तालुक्यातील युवक आणि विद्यार्थ्यांशी थेट संपर्क लक्षात घेऊन त्यांची रोहित पवार फाऊंडेशन नांदगाव खंडेश्वर ग्रामीण तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय खासदार अमर काळे, हेमंत देशमुख, तेजस्वी ताई बारब्दे, मंगेश भटकर, सचिनभाऊ रिठे, साजिद भाई, मनोज भाऊ गावंडे, शिवराज वाकोडे ( विदर्भ प्रभारी,रोप ) किशोर गुलालकरी, श्रीकृष्ण रंगाचार्य, धर्मराज परळीकर, अमोल हीरोडे, राजू सावदे, संदीप मोरे यांना दिले.नियुक्तीबाबत सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.