
निर्मळ वारी पंढरीचीतून’पंढरपूरात दुमदुमणार दत्त नामाचा गजर…!!!
श्रीक्षेत्र माहूर / संजय घोगरे
दि.१६जूलै २०२५ रोजी श्री.आनंद दत्त धाम आश्रमाकडून महाराष्ट्र शासनाचे स्वच्छतादूत तथा श्री.आनंद दत्त धाम आश्रमाचे मठाधीपती राष्ट्रसंत द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर यांच्याकडून तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे.नुकतेच आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचे पावन पर्व पंढरपूर या पावन स्थळी संपन्न झाले असून या ठिकाणी भक्ती भावाने लाखो भाविक व वारकरी दर्शनासाठी आलेले होते.व निरंतर विठ्ठल भक्तीने पंढरपूरात भक्तीचा जागर चालूच असतो.या ठिकाणीच श्री.आनंद दत्त धाम आश्रम व सद्गुरु साईनाथ महाराज वसमतकर यांनी दत्त नामाचा गजर करीत स्वच्छता अभियान राबविण्यासाठी संकल्प केला आहे हे विशेष.
नेहमीच स्वच्छता,आरोग्य, वृक्षारोपण,अन्नदान,व्यसनमुक्ती,
राष्ट्र भक्ती व शिक्षण या सप्तसुत्रीस शिरवंद्य मानत श्री.आनंद दत्त धाम आश्रमाकडून विवीध उपक्रम राबवून सामाजिक सलोखा साधण्याचा श्री.आनंद दत्त धाम आश्रमाचे मठाधीपती राष्ट्रसंत द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर यांनी संकल्प सिद्धीस नेला आहे.सर्वप्रथम स्वच्छता व नंतर दत्त नामाचे प्रवचन व किर्तन या माध्यमातून पंढरपूर येथील हा सोहळा संपन्न होणार असून यात व्यसनमुक्ती,आरोग्य, शिक्षण व भक्तीमार्गातून समाजकार्य हे विषय राष्ट्रसंत द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर हे घेणार आहेत तसेच सर्व धर्म, पंथ यांना भक्तीपूर्वक राष्ट्रप्रेम साधावे असाही संदेश दिला जाणार असून साईनाथ महाराज यांच्या समवेत अनुयायांसह,भक्त व मान्यवर हजारोंच्या संख्येत जाणार आहेत. या कार्यक्रमातून महाराज व भक्तगण पंढरपूरात जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर पायी दिंडी काढणार आहेत तसेच दरम्यान च्या काळात ते स्वच्छता अभियान संपन्न करणार आहेत.त्यानंतर दत्त किर्तन होणार असून. पुढे दि.१७ जूलै २०२५ रोजी पंढरपुर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून दि.१८ जूलै च्या किर्तन व स्वच्छता अभियानाने या अभियानाची सांगता तुळजापुरात करण्यात येणार आहे.नेहमीच श्री.आनंद दत्तधाम आश्रम व राष्ट्रसंत सद्गुरु द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर तथा बितनाळकर यांनी आपल्या विवीध उपक्रमांतून भक्तीमार्गातून समाजकार्य व राष्ट्रप्रेम वृद्धिंगत केले आहे.त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्र राज्याचे स्वच्छतादूत म्हणजेच ब्रॅण्ड अम्बेसिटर म्हणून निवड करुन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. महाराजांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक तर होतच आहे परंतू त्यांचा आदर्श आज तरूणांसहीत समाजात सर्व स्तरांतून घ्यावा असे गौरवोद्गार सर्वत्र निघत आहेत. निर्मळ वारी पंढरीची या प्रवासासाठी व कार्यक्रमासाठी शुभेच्छा ज्योतिबा खराटे, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी , नंदू संतान, जवाहरलाल जयस्वाल, रमेश बद्दीवार,शेषराव पाटील सर, विजय आमले, ईलीयास बावानी, संजय घोगरे,जयकुमार आडकीणे, भाग्यवान भवरे, विजय घाटे, सुधीर जाधव, मिलिंद कंधारे यांच्यासह अनेकांनी शुभकामना दिल्या आहेत.