
शाहू महाराज विद्यालयात शाहू महाराजांना अभिवादन
सालोड कसबा/ अंकुश निमनेकर
समता,समाजवाद आणि लोकशाहीची स्थापना करून वर्णव्यवस्था सोडणे हे शाहू महाराजांचे ध्येय होते. हे ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी मागासवर्गीयांना नोकरीत 50 टक्के आरक्षण देऊन त्यांच्या उन्नतीचा मार्ग खुला केला. कुठलाही भेदभाव न करता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन मदतीचा हात दिला त्यामागे त्यांचा एकच उद्देश होता की शिक्षणामुळे परिवर्तन घडू शकते यासाठी त्यांनी स्वतः शाळा,कॉलेज, वसतिगृह काढून बहुजनांची शिक्षणाची सोय उपलब्ध केली. त्यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक नागरिकांनी काम करण्याची गरज आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव अभ्यंकर यांनी ग्रामीण भागात बहुजनांच्या मुलांसाठी शाळा उघडल्या आणि या शाळेचे नावही छत्रपती शाहू महाराज हे ठेवून विद्यार्थ्यांपर्यंत शाहू महाराज यांचे विचार पोहोचावेत, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी हा त्यामागचा उद्देश. असे प्रतिपादन मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री अविनाश पवार यांनी सालोड कसबा येथील राहुल व्यायाम प्रसारक मंडळ भूमिपुत्र कॉलनी अमरावती द्वारा संचलित विद्यालय व श्री वसंतदादा पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित शाहू महाराज जयंती कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले.
याप्रसंगी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अविनाश पवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विनोद इंगळे प्रा. वैशाली रहाटे प्रा. अनिल गवई प्रा. मोहिनी माकोडे, रूपाली विचे हे उपस्थित होते. याप्रसंगी विनोद इंगळे, प्रा. वैशाली रहाटे यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थिनी आरुषी मोटे, रुषदा अक्रम ,अक्षरा मोटे ,गुंजन मुधोळकर, वेदिका रामटेके, गौरी घवळे , राधिका मुधोळकर ,सृष्टी ठाकरे ,श्रेया मोटे, खुशी राऊत इत्यादी विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रा. मोनू सरदार, प्रदीप नितनवरे, विकास फसाटे,आकाश वंजारी, तुषार रामटेके, गोरखनाथ पर्वतकर, शंकर मेहरे, शुभम इंझळकर, वैष्णवी तिवसकर,प्रगती इझळकर,रेश्मा घवळे, उमेश विलायतकर, गजानन भोंगरे, सविताताई राऊत इत्यादींनी प्रयत्न केले