
दिव्यांग विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव.
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर पंचायत समीती अंतर्गत शिक्षण विभागाणे तालूक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षिण साहित्य वाटप व तालुक्यातील १० वी व बारा वी मध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणात रुची वाढावी व त्यांना भविष्यात उच्च शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी गटशिक्षणाधिकारी नांदगाव खंडेश्वर कल्पना वानखेडे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करुण त्यांना प्रोत्साहीत केले.तर १० वी व १२ वी मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वरचे गटविकास अधिकारी डॉ स्नेहल शेलार,गट शिक्षणाधीकारी कल्पना वानखडे,विस्तार अधिकारी संजय बाबरे,माजी गटशिक्षणाधिकारी प्रमिला शेंडे,केंद्र प्रमुखअनिल कोल्हे,बलदेव घुगे, बिआरसी कर्मचारी गजानन उल्हे,गोपाल ढवळी,वैशाली दहीकर,निरंजन नांदुरकर,चारुशिला लिंगोट,नवेद मसरत,निलीमा रंगारी,संदिप गुल्हाने,अलका हुमने, उपस्थित होते व कार्यक्रमाचे संचालन वैशाली दहीकर यांनी केले .तर अशा प्रकारचा कार्यक्रम दरवर्षी राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जावे अशी चर्चा संपुर्ण पंचायत समिती परिसरात होती.