अमरावती येथील दरारा लोकशाहीचा संपादक राज माहोरे यांचा कलम का सिपाही पुरस्कारने दिल्ली येथे सम्मानित
नवी दिल्ली/ प्रतिनिधी
न्यूजपेपर असोसिएशन ऑफ इंडिया (NAI) तर्फे व सरचिटणीस डॉ. विपिन गौर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित १२ वे कलम के सिपाही पुरस्कार सोहळा नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास देशभरातील प्रख्यात पत्रकार, विद्वान व माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.मुख्य अतिथी त्रिवेंद्रसिंह रावत (सांसद व माजी मुख्यमंत्री, उत्तराखंड), विशिष्ट अतिथी तीरथसिंह रावत (माजी मुख्यमंत्री व माजी खासदार, उत्तराखंड) तसेच अल्जेरियाचे राजदूत डॉ. अब्देनोर खेलेफी यांनी सोहळ्याची शोभा वाढवली.आपल्या भाषणात त्रिवेंद्रसिंह रावत यांनी भारतीय पत्रकारितेची उच्च परंपरा अधोरेखित केली. “राजकारणी असोत वा अभिनेते, सर्वांनाच माध्यमांवर अवलंबून राहावे लागते. शासन घडविण्यापासून ते कारभार चालविण्यापर्यंत माध्यमांची भूमिका महत्वाची आहे,” असे त्यांनी नमूद केले. चुकीच्या माहितीबाबत इशारा देत त्यांनी युवक पत्रकारांना सत्यता पडताळणीशिवाय बातमी प्रसिद्ध न करण्याचे आवाहन केले.तीरथसिंह रावत यांनी डिजिटल माध्यमांच्या वेगवान व प्रभावी भूमिकेवर भर दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ मोबाईलवर अवलंबून न राहता स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करण्याचे सांगितले आणि जीवनातील संधी साधण्याची आठवण करून दिली.NAI च्या ३३ व्या स्थापना दिनानिमित्त, डॉ. विपिन गौर यांनी पत्रकारितेला नैतिकतेच्या दिशेने वळवण्याचा निर्धार व्यक्त केला. “माध्यम हे समाजाचे आरसे आहे आणि हेच आरसे बदलाला दिशा देते,” असे सांगत त्यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.
२०२५ मधील मान्यवर पुरस्कार विजेते
या वर्षी कलम के सिपाही पुरस्कारांत पत्रकारिता, साहित्य, शिक्षण, माध्यम आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करण्यात आला. प्रमुख सन्मानितांमध्ये
• पत्रकारिता व माध्यम : सुमित चौधरी (आज तक), संजय सिंह, कृष्ण धमीजा (पंजाब केसरी), जयप्रकाश शर्मा (Zee Media), मयूर शुक्ला (Zee Media), साबी हुसेन (Times of India), नवीनलाल सूरी (India Today Group), अमृता गर्ग (News Nation), निलिमा प्रियदर्शिनी (Argus News), दीप्ती मिश्रा (जागरण न्यू मीडिया), पंकज गिरी (Zee Media), प्रवीण माहोरे (दरारा लोकशाहीचा).

• शिक्षण व साहित्य : प्रा. (डॉ.) ऋतु सूद (शारदा विद्यापीठ), सुमित कुमार (पत्रकार व कवी), शुभम बधानी (संस्थापक, घोडा लायब्ररी).
• डिजिटल व कला क्षेत्र : हरीश शर्मा (डिजिटल कलाकार), अविरल मिश्रा (IT व सोशल मीडिया तज्ञ).
• रेडिओ व प्रसारण : RJ त्रिप्ती (इन्फ्लुएंसर), RJ हरी (Radio City), RJ अतिशय (Ishq FM).
• सामाजिक व शैक्षणिक सेवा : राजेश शर्मा (हमरो प्रजाशाक्री), करण सिंह (K.R. मंगळम विद्यापीठ), साजिना खान (NITI Aayog).कार्यक्रमाची सांगता NAI उपाध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी आभारप्रदर्शनाने केली. सोहळ्याचे यशस्वी आयोजन विवेक शर्मा, मितांशु अग्रवाल, पुष्कर नेगी व राहुल गुप्ता यांनी केले.कलम के सिपाही पुरस्कार पत्रकारितेतील नैतिक मूल्यांचे प्रतीक ठरले असून, समाजासाठी कार्य करणाऱ्या माध्यम व व्यक्तींचा सन्मान करत आहेत.
