नेर परसोपंत/ तालुका प्रतिनिधी
प्रख्यात श्री गणपती मठ संस्थान,नेर गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ,वीरशैव गणपती म्हणून गणरायाची ओळख व,नेर शहराला लाभलेली ही अविरत श्रेष्ठ परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडवणारी असून पिढ्यान पिढ्या जपल्या गेलेली नेर करांची तीच परंपरा आजही कायम आहे.लाखो भाविक गणेशोत्सवा दरम्यान गणपती मठ संस्थान येथे आपल्या मनोकामना घेऊन दर्शनास येतात.अनेक भाविक गणपती कडे नवस ही कबुलतात व नवस पूर्णत्वास आल्यावर नवस ही फेडतात.म्हणून नवसाला पावणारा गणपती म्हणून नेर येथील गणपती मठ संस्थान ची ख्याती सर्वदूर आहे.आरोग्याने त्रस्त असलेल्या अनेक भाविकांना इथे चमत्कार झाल्याने,व जे सुख पदरात मागितले ते मिळाल्याने गणपती मठाच्या गणरायावर अपरंपार श्रद्धा आहे.गणपती मठ संस्थानमध्ये फक्त गणेशोत्सवातील दहा दिवसांत श्री गणरायाची मूर्ती विराजमान होते.वंशपरंपरागत मूर्तिकारकडून श्रींची मूर्ती पालखीत विराजमान होऊन गणपती मठाच्या दिशेने प्रस्थान करते दरम्यान अनके श्रद्धाळू गणरायाच्या पालखीची पूजा करतात,टाळ मृदंग व पारंपरिक ओव्यांच्या भजनात पालखी मठाच्या दिशेने प्रस्थान करते.भाविक मोठ्या आस्थेने या आगमन सोहळ्यात सहभागी होतात.विधिवत पूजा करून गणरायाची मूर्ती विराजमान केल्या जाते.कलशपूजन केल्या जाते.व भव्य आरती केल्या जाते.आराधना आरती करण्याची वेळ सकाळी ९ व सायंकाळी ७.३० अशी असते याच वेळेवर श्रद्धाळू भाविक आरती करीता एकत्र येतात.असा हा दहा दिवसाचा नित्य दिनक्रम आहे.व दिवसभर लांब- लांबून लोक दर्शनासाठी येतात.विविध मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन सभागृहामध्ये आयोजित केले जातात.वामन जयंती या तिथीला भव्य असा महाप्रसाद आयोजित केला जातो.हा महाप्रसाद सुरू होण्या अगोदर जंगम व लिंगायत यांची संकल्पाची पंगत होते त्यांनंतरच महाप्रसाला सुरुवात होते अशी परंपरा आहे.सर्व जाती हिंदू म्हणून एकत्रित आणणारी १०६१ वर्षाची परंपरा दिसून येते.सगळ्या जातीय लोकांकडे आपापल्या कार्याचा मान वंशपरंपरागत आहे.मशालधारी,पालखीचे भोई,सोंगातील सहभागी,सेवेकरी,पूजेकरी अशे अनेक मान आहेत.महाप्रसाद आटोपल्यानंतर दहीहंडी,व त्यानंतर पारंपरिक सोंगाना सुरुवात होते.दशावतारी सोंगे येथे परंपरागत साकारली जातात या सोंगात तरुण,प्रौढ व वृद्ध सुद्धा सहभागी होतात ही विशेषतः आहे.सोंगांमध्ये भिकरवाडा, कृष्ण गौळण,गणपती रिद्धी सिद्धी,देवी,शंकर, यशोदा कृष्णा,मत्स्यअवतार अशी सोंगे केली जातात.मुख्यत्वे श्रींचा पालखी सोहळा व नगर भ्रमण मोठ्या दिमाखात पार पाडतो.श्रींच्या विसर्जन मिरवणुकीची पारंपरिक प्रथा द्विदिवसीय आहे.पहिल्या दिवशी मठातून श्रींची आरती होऊन पालखी मिरवणुकी साठी बाहेर पडते.पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्रींच्या मिरवणुकीला प्रारंभ होतो.ज्या मार्गाने पालखी मार्गक्रमित होते त्या मार्गाने पालखीची व श्रींची पूजा अर्चना केली जाते.श्रींच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात मुख्य मार्गावर गर्दी करतात.संपूर्ण नेर नादब्रम्ह होऊन गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषाने दुमदुमते.श्रींची पालखी आपल्या नियोजित निवस्थानी विश्रामास थांबते.विश्रांती स्थळी सुद्धा भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी करतात.थोड्या अवकाशयानंतर सोंगाना सुरवात होत,त्यात देवीचे सोंग,शंकर-यशोदा कृष्ण, मत्स्यअवतार सोंग ही सोंगे रात्रभरापासून दिवस निघेपर्यत सुरूच असतात ही सोंगे बघण्यासाठी भाविक जमाव करतात.तर विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३०ला आरती झाल्यानंतर श्रींची पालखी विसर्जनासाठी पुढे जाते.दरम्यान पालखी माधवपुरातून बाराधारी नदी अर्थात विसर्जन स्थळी पोहचन्यासाठी रवाना होते.माधवपूर मधून जात असतात भाविक पूजाअर्चा करतात.व दुपारी १ च्या जवळपास पालखी विसर्जन स्थळी पोहोचते.शेवटची आरती होते व पोर्णिमेअगोदर बाप्पांचे नियोजित जागी विसर्जन होते.नंतर मठात जाऊन दर्शन घेऊन लाह्या फुटाणे वितरित केल्या जाते.एकमेकांच्या पाया लागल्या जातात.अशी १०६० वर्षाची परंपरा लाभलेला नेर परसोपंत येथील वीरशैव गणपती सर्वांचा आश्रयदाता आहे.नेर परसोपंत हे शहर अमरावती यवतमाळ रोड वर आहे याचं नेर शहरात श्री सोमेश्वराचे पुरातन शिव मंदिरही आहे.अश्या मूर्तिमंत इतिहासाने उभारलेल्या नेर शहराचे व येथील परंपरेचे लौकिक सर्वत्र ध्यानस्थ आहेत.नवसाला पावणारा हा वीरशैव गणपती भक्तांच्या आराधना पूर्ण करतो नवसाला पावतो.अशे प्रचिती आलेले अनेक भाविक सांगतात.मठ सुबक कलाकृतीने संगमाचे बनले असून रेखीव आहे.येथे दर्शनास गेल्यावर नक्कीच चैतन्य प्राप्ती होते.श्री गणपती मठ संस्थानास अवश्य भेट द्या व आपल्या मनोकामना पूर्ण करा.
हितेश अनिलजी श्रृंगारे,९९६७१६४९६२,नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ
