
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
राज्यभरातील युवाकार्यक्रमाबाबत ध्येय, उद्दिष्ट व कार्यक्रम अंबलबजावणीकरण्याकरिता राज्याच्या युवा धोरणाची निर्मिती करण्यात येते महाराष्ट्र शासनाच्या शालेयशिक्षण व क्रीडा विभागाने राज्याच्या नवीन युवा धोरणासंदर्भात एक महत्त्वपूर्णपाऊल उचलले आहे. महाराष्ट्र राज्यात युवा धोरण, २०१२ च्या आधारे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी एक नवीन समितीगठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा वयुवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्कसंघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेटसदस्य तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेषकार्यकारी अधिकारी डॉ. मनीष शंकरराव गवई यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
असून नुकतेचत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य युवाधोरणाबाबत शिफारशी मांडल्या.त्यांचसंदर्भात येत्या रविवारी १० ऑगस्टला युवावाणी सदरात युवा धोरणाबाबत डॉ.मनीष गवईयांची आकाशवाणीवर मुलाखात सकाळी १० वाजता प्रसारीत करण्यात येणार आहे. याप्रसंगी राज्यातील युवकांसाठीनाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी युवकांशी संवाद साधण्यासाठी युवा संवाद दौराकरणार असल्याचे त्यांनी मुलाखतीतून स्पष्टकेले. राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री यांनी विशेष निमंत्रित सदस्य डॉ.मनीष गवई यांचे स्वागत देखील केले. अमरावतीच्या मातीला राज्यातील युवकांचे नेतृत्वकरण्याची संधी डॉ.मनीष गवई यांच्या रूपाने प्राप्त झालीआहे.युवक कल्याण क्षेत्रात डॉ.गवई यानीसमाजासमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे. युवकांना सशक्त करण्यासाठी केंद्र शासनानेयुवा धोरण जाहीर केले असून या केंद्र शासनाच्या धोरणाबाबत जनजागृती करण्याच्याउद्देशाने डॉ.मनीष गवई यानी युवकांना जागृत करण्याचे काम करीत आहे अंतर्राष्ट्रीयपातीळवर देखील या विषयाला घेऊन त्यानी चीन, नेपाळ सह सार्क देशात सादरीकरण केलेअसून त्यानी राष्ट्र बांधनीत युवकाचा सहभाग, युवा विचार आदान प्रदान,युवा मैत्री यावर प्रकाश टाकला आहे. तसेच देशाच्या विकासात युवकांचीभूमिका यावर सार्क देशात बाजू मांडली आहे. युवकांना जागृत करण्यासाठी त्यानी अनेकसामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. सार्क देशात युवकांशी त्यानी सवाद साधला वमैत्रिचा सदेश दिला आहे.महाराष्ट्र शासनाच्या सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठीगठीत समितीमध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून डॉ. मनीष गवई यांची निवडकरण्यात आली असून त्याबाबत युवावाणी सदरात राज्याचे सुधारित युवा धोरण आणि आजचायुवक या विषयावर येत्या रविवारी १०ऑगस्टला युवावाणी सदरात युवा धोरणाबाबत डॉ.मनीष गवई यांची आकाशवाणीवर मुलाखत सकाळी१० वाजता प्रसारीत करण्यात येणार आहे. तरुण पीढीला मार्गदर्शन तथा रोजगारच्या आणिस्वविकासाच्या नव्या वाटा या मुलाखातीतुन सांगण्यात येणारआहे.ही मुलाखात तरुणासाठीअतिशय प्रेरणादाई, लाभदायक असून या मुलाखातीचा लाभ आजच्यातरुण पीढीने घेण्याचे आवाहन अमरावती आकाशवाणीच्यावतीने करण्यात आले.डॉ.मनीष गवईयांच्या मध्यमातुन अमरावतीच्या मातीला राज्यातील युवकांचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे.विशेष बाब ही की नुकतेचत्याना अंतर्राष्ट्रीय युवा पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. त्यानायुवक कल्याण क्षेत्रातील भरीव योगदानासाठी सहा अंतर्राष्ट्रीय, एकविस राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेआहेत. विशेष म्हणजे हा सन्मान प्राप्त करणारे ते सर्वात कमी वयाचे युवक आहेत.त्यांच्या भरीव कामगिरीसाठी त्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनेचेसदस्यत्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल देशाचे क्रीडा व युवककल्याण राज्य मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री श्री. रामदास आठवले, राज्यसभा खासदार डॉ अनिल बोन्डे,खासदार बळवंत वानखडे , पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रवि राणा,आमदार सौ सुलभाताई खोडके,रविराज देशमुख, डॉ रोमा बजाज,डॉ प्रदीप दंदे, डॉ रुपेश खडसे,पंकज जाधव, नितीन बोरेकर,विशुद्धानंद जवंजाळ, क्रांतिभूषण खडसे, महेंद्र भालेकर, राजू नन्नावरे, जगदीश गोवर्धन,सलीम मिरावाले,डॉ.अनीता वानखड़े, माधुरी चव्हाण डॉ. कुणाल इंगळे, डॉ संगीता पाटील, डॉ हसीना शाह, मिथिल कळबे,ब्लू टाइगर संघटनेचे अध्यक्ष अड़. सुधीरतायडे, ,यशवंत तायडे,तथागत टीवीचे अरुण वानखडे, गौतम वानखडे, कुमार गौरव, मो. शफी सौदागर राजाभाऊ गडलिंग, सदेश तायडे,प्रेम जवजाळ, पत्रकार अमित तायडे, सूरज गवई,भारत मोंढे,नरेंद्र गुलदेवकर,आनद गजभिये, आकाश बिजवे,जयदीप सराफ, प्रकाश मेश्राम , निखिल आकोडे,निलेश दाभणे, डेटाराम मनोजा, छगन तायडे, पांडुरंग धुमाळे, शेलेंद्र मिश्रा,आदिनी शुभकामना दिल्या.